विवेकानंद आणि हिंदुधर्माचे विवेचन

Author: Share:

हिंदू धर्माच्या तत्वज्ञानाची गोडी काही अवीट आहे. कारण मुळात हिंदू धर्म इतर धर्मांप्रमाणे (सर्व धर्मांचा आदर राखून) कुण्या एका प्रेषिताने बनवलेला नाही. मुळात हिंदू धर्माची उत्पत्ती वेदांतून झाली आहे. वेद हा ‘विद’  शब्दापासून बनला आहे ज्याचा अर्थ आहे “ज्ञान”. ज्या धर्माचा पायाच ज्ञान आहे, तो धर्म किती जयोस्तु असेल.!

हिंदू धर्म आणि तत्वज्ञान वेगवेगळे नाहीत. हि त्याची पहिली गोडी आहे. आज हिंदू धर्म म्हटला कि तथाकथित धर्मनिरपेक्ष म्हणवणाऱ्या लोकांच्या अंगावरून झुरळ फ़िरतात. मात्र आपल्या सुंदर धर्माचा पाया तत्व आहे आहे, तत्त्वातून अनंताची व्याप्ती धर्माने गाठली आहे. म्हणूनच हिंदू धर्मात, ‘धर्म’ या शब्दाचा अर्थ कर्तव्य असा आहे. आज दुर्दैवाने, धर्माचा अर्थ तत्वज्ञानाला फाटा देऊन शोधला जातोय आणि या पार्श्वभूमीवर, स्वामी विवेकानंदांनी धर्मदूत म्हणून केलेले कार्य फार मोठे आहे.

“धर्म दूत” हा शब्द फार जाणीवपूर्वक योजला आहे. बौद्ध , ख्रिस्चन आणि इस्लाम धर्माप्रमाणे, धर्म प्रसारार्थ हिंदू धर्म प्रसारक देशोदेशी गेल्याची उदाहरणे फारशी नाहीत. किंबहुना, अशोकाने प्रयत्न केले तसे जाणीवपूर्वक प्रयत्न हिंदू धर्माच्या प्रसारासाठी केले गेले नहित. मात्र, हि आपल्या धर्माची खोट नाही, तर महती आहे. कारण, प्रसारक नसूनही हिंदू धर्माचा प्रसार प्राचीन काळी बराच दूरवर झाला होता. याबद्दल स्वतः स्वामी विवेकानंद एक फार छान मत व्यक्त करतात, ते म्हणतात, ” अन्य धर्माप्रमाणे, हिंदू धर्माला स्वतःच्या प्रसाराची दवंडी पिटवण्याची गरजच नाही . त्यामुळे आमचे प्रसारक फिरण्याची गरज नहि. येणाऱ्या काळात, जगभरातून अनेक माणसे प्रेम आणि दया भाव शिकवणाऱ्या हिंदू धर्माकडे वळतील अशी आशा त्यांना वाटते.त्यामुळे हिंदू धर्माला स्वतःहून आक्रमकपणे प्रचाराची गरज नाही, युद्ध तर अजिबातच नाही, तर स्वतःच्या संयमाच्या शिकावणुकीनेच तो जगाचे हृदय जिंकेल.

हिंदुधर्माचे विशाल हृदय

स्वामीजींनी आपल्या पहिल्याच भाषणात, अमेरिकन लोकांना उद्धेषित करताना हिंदू तत्वज्ञानाच्या थोरवीचा प्रत्यय दिला. त्यामुळे अमेरिकन जन सुखावुन गेले. बाकी उपस्थित सारे धर्मतत्वज्ञ ‘माझाच धर्म मोठा आणि मीच तो शहाणा, आणि तुमच्याकडे धर्मज्ञानाचा अभाव झाला म्हणून तुम्ही आम्हास बोलावले’ असा आव आणत होते, त्यावेळेस स्वामीजींनी,  ‘देशोदेशीच्या ज्ञानेश्वरांना एकत्र आणण्याची कल्पना फक्त अमेरिकनांनाच सुचू शकते असे म्हणून अमेरिकनांचे आभार मानले’.(My thanks to those noble souls whose large hearts and love of truth first dreamed this wonderful dream and then realized it.)

ते म्हणतात,

l thank you in the name of the most ancient order of monks in the world; I thank you in the name of the mother of religions; and I thank you in the name of the millions and millions of Hindu people of all classes and sects.

मी सर्वात प्राचीन संन्यस्तांच्या भूमीच्या वतीने आणि ‘सर्व धर्मांची आई’ असणार्या धर्माच्या वतीने, करोडो विविध जातीच्या आणि पंथांच्या हिंदू लोकांच्या वतीने तुमचे आभार मानतो.

या विधानात तीन बाबी लक्षात घेण्यासारख्या आहेत. ते स्वतःला हिंदू धर्माचे संन्यासी म्हणतात. यापुढे ते या धर्माला, संन्यस्तांच्या श्रेणीला सर्वात प्राचीन असे सम्बोधतात. हे विधान फार महत्वाचे आहे. स्वामीजींनी या भारतभूमीच्या प्राचीन वारशा संबंधी आणि श्रीमंत परम्परेसंबंधी जागोजागी अनेक भाषणांमध्ये, लेखांमध्ये उपकार व्यक्त केले आहेत. ते म्हणतात ‘मी सुदैवी आहे कि मी अशा सुंदर भरतभूमिचा पुत्र म्हणून जन्माला आलो’. पुढे भारतातील तरुणांना राष्ट्रभक्तीचे धडे देताना ते याच प्राचीन वारशाबद्दल तरुणांना अभिमान बाळगायला सांगतात. ज्या भूमीला इतका श्रीमंत इतिहास लाभला आहे, त्या इतिहासाची साक्ष ठेऊन भविष्य घडवण्याचा क्रांतिकारक विचार स्वामीजी मांडतात, तो आपण अंगी भिनवण्यासारखा आहे. आणि त्यानंतर ते हिंदुधर्माला सर्व धर्मांची आई म्हणतात. स्वमिजीन्सारखा सृजनशील द्रष्टा संन्यासी , ‘आई’ हा शब्द चुकून उच्चारणार नाहि. स्वमिजींना ‘आई’ या शब्दातून, धर्माच्या तत्वज्ञानात पाझरणारे सर्व चराचरासाम्बंधीचे प्रेम व्यक्त करायचे आहे. निरपेक्ष वृत्तीचे प्रेम. प्रचंड कळकळ आणि सर्व प्राणीमात्रांचे कल्याण. ज्ञानेश्वर महाराजांच्या पसायदानातील “जो जे वांछील तो ते लाहो” हा विचार तोच आहे. म्हणूनच राम शेवाळकर माऊलींना आई म्हणतात.

सर्व धर्मांना सामावणारा धर्म 

त्यापुढे ते म्हणतात, माझ्या मातृभूमीने आणि धर्माने कुठल्याही इतर धर्माला तुच्छ मानले नाही. सर्व धर्माच्या लोकांना, झोराष्ट्रीयन धर्मातील आश्रितांना धर्म न विचारता माझ्या देशाने आश्रय दिला आहे. हिंदू धर्माने संयम आणि सर्वस्वीकृतीला अग्रस्थानी मानले आहे.

I am proud to belong to a religion which has taught the world both tolerance and universal acceptance. We believe not only in universal toleration, but we accept all religions as true. I am proud to belong to a nation which has sheltered the persecuted and the refugees of all religions and all nations of the earth. I am proud to tell you that we have gathered in our bosom the purest remnant of the Israelites, who came to the southern India and took refuge with us in the very year in which their holy temple was shattered to pieces by Roman tyranny. I am proud to belong to the religion which has sheltered and is still fostering the remnant of the grand Zoroastrian nation. I will quote to you, brethren, a few lines from a hymn which I remember to have repeated from my earliest boyhood, which is every day repeated by millions of human beings:

वेदातील एक सुंदर ऋचा  ते उच्चारतात, “ज्याप्रमाणे नदीची सर्व पात्रे  समुद्रास जाउन मिळतात, त्याप्रमाणे माणसे जरी वेग वेगळे मार्ग देवाच्या प्रार्थनेसाठी वापरत असतील, तरी प्रार्थना शेवटी एकाच देवाला जाउन मिळते.”

ह्या एका ॠचेत हिंदू धर्माच्या सर्व समावेशक विचारसरणीचा  प्रत्यय जगाला आला. आपल्या देशाच्या इतिहासात हि घटना सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या फार महत्वाची आहे. म्हणूनच विवेकानंदांचे या देशावर कर्ज आहे. स्वामीजींनी धर्म परिवर्तनावर विश्वास ठेवणाऱ्या ख्रिश्चनांना सांगितले, कि आमचा धर्म सर्व धर्म सत्यच आहेत असे मानतो, यावर त्यांनी वरील ऋचेचा प्रत्यय दिल. मिशनरींचे तोंड गप्प होण्यास त्याने मदत झालि.

धर्मपरिवर्तन हा उपाय नाही

स्वामीजी जेंव्हा हे सांगतात कि हिंदू धर्म सर्व धर्मांना स्वीकृत करतो आणि सत्य मानतो, अर्थातच धर्म प्रसारक आणि धर्मान्ताराच्या प्रथांवर स्वामीजी मृदू भाषेत कठोर ताशेरे ओढतात. ते म्हणतात,

Much has been said of the common ground of religious unity. I am not going just now to venture my own theory. But if anyone here hopes that this unity will come by the triumph of any one of the religions and the destruction of the others, to him I say, ‘Brother, yours is an impossible hope.’ Do I wish that the Christian would become Hindu? God forbid. Do I wish that the Hindu or Buddhist would become Christian? God forbid. The seed is put in the ground, and earth and air and water are placed around it. Does the seed become the earth, or the air, or the water? No. It becomes a plant. It develops after the law of its own growth, assimilates the air, the earth, and the water, converts them into plant substance, and grows into a plant. Similar is the case with religion. The Christian is not to become a Hindu or a Buddhist, nor a Hindu or a Buddhist to become a Christian. But each must assimilate the spirit of the others and yet preserve his individuality and grow according to his own law of growth… Holiness, purity and charity are not the exclusive possessions of any church in the world… If anybody dreams of the exclusive survival of his own religion and the destruction of the others, I pity him from the bottom of my heart.”

“सर्व धर्मांमध्ये समानता असावी ह्यासाठी एक धर्माने दुसर्या धर्मावर विजय मिळवावा अशी तुमची अपेक्षा असेल तर तुमची अपेक्षा चुकीची आहे “. ते म्हणतात ” हि माझीही अपेक्षा नाही कि ख्रिश्चनाने हिंदू व्हावे. तसेच मी हीसुद्धा इच्छा बाळगणार नाही कि हिंदूने व बौद्धाने ख्रिश्चन व्हावे. बी मातीत रोविले जाते, त्याभोवती पाणी,आणि हवेचे आवरण असते…ते बी मातीत रुपांतरीत होते का? नाही; त्यातून रोपाचा जन्म होतो.  तसेच, हवा, पाणी रोपातील भाग होऊन जातात. धर्मांचेही तसेच आहे. ख्रिश्चनाने हिंदू होण्याची व हिंदूने ख्रिस्चन होण्याची आवश्यकता नाही. पण प्रत्येकाने एकमेकांच्या तत्वांचा आदर केला पाहिजे आणि स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व ठेऊन, स्वतःच्या विकासाच्या कायद्याप्रमाणे जगले पाहिजे.

पावित्र्य, निर्मळता आणि समाजविकास जगातील कुठल्याही चर्च चे एकमेव अधिकार नाहीत.जर कोणालाही दुसऱ्या धर्माचा विनाश करून स्वतःच्या धर्माचेच अस्तित्व ठेवण्याची स्वप्ने पडत असतील  तर, मला माझ्या हृदयाच्या खोलीपासून त्याची कीव करावीशी वाटते… “

विवेकानंदांना त्या वेळी असलेल्या धर्मांतराच्या रुढीवर टीका करायची होती हे स्पष्ट आहे. ख्रिश्चन आणि इस्लाम धर्मियांनी हिंदू धर्माला चुकीचे, भोंदू ठरवून, आपलाच धर्म काय तो श्रेष्ठ आणि उच्च हे ठरवण्याची अहमहिका चालवली होति. त्यासाठी हिंदू विश्वास आणि देवत्वापासून वेदांपर्यंत सर्वावर आसूड ओढले गेले. मात्र यावर कुरघोडी म्हणून सक्तीच्या धर्मांतराची मालिका पाच शतके सुरु होति. विवेकानंद अमेरिकेस गेले त्यावेळेस, हिंदू धर्माबाबतीत पाश्चात्य जगात प्रचंड अंध:कार होता. त्यामुळे, हि परिषद म्हणजे हिंदू धर्माला स्वत:ला सिद्ध करण्याची सुवर्णसंधी होति. या वेळेस आमचे सुदैव होते कि विवेकानंदान्सारखा एक अतिशय बुद्धिमानआणि इंग्रजीवर प्रचंड प्रभुत्व असणारा तत्ववेत्ता हिंदू धर्माला दूत म्हणून लाभला.

विवेकानंदांनी आपल्या वेद वेदांतावरील प्रचंड अभ्यासाने केवळ धर्माचा बचाव केला नाही, तर अतिशय संयमी भाषेत, धर्मातील तत्वज्ञानाचे अमृत अवघ्या जगाला पाजलेच, पण आपल्या बांधवांनाही भीती, नैराश्य आणि पराभूत मनोवृत्तीतून बाहेर काढले. जगाने हिंदू धर्म शिकण्यासाठी औत्सुक्य दाखवल्यावर, मिशनरी आपल्यावर बिम्बवतात त्याप्रमाणे आपल्या धर्मात खुळचट कल्पना नाहीत, पण स्वतःला सर्वश्रेष्ठ  म्हणवणाऱ्या पाश्चात्य जगालाही शिकावेसे वाटते असे आपले तत्वज्ञान आहे यामुळे आपल्या लोकांचा आत्मविश्वास कमालीचा वाढला. विवेकानंदांचे या भूमीवर उपकार थोर !

भेदाभेद भ्रम अमंगळ ….

” विवेकानंद कुठल्याही भेदाभेदाच्या विरुद्ध आहेत. ते म्हणतात, या भेदाभेदांनी आणि स्वतःला शुद्ध रक्त मानणाऱ्या विचारांनीच जगात प्रचंड रक्तपात आणि भीषण नरसंहार घडवून आणला आहे. त्याशिवाय , मानवजातीचा आजच्या तुलनेत प्रचंड जास्त विकास झाला असता. “

याचा अर्थ असा नव्हे कि जाती आणि पंथांच्या ते विरुद्ध आहेत.मात्र जर धर्मांनी स्वतःला श्रेष्ठ आणि दुसरा कनिष्ठ समजण्यास सुरुवात केली तर त्याचा परिणाम घातकच झाला आहे. विवेकानंदांनी आशा व्यक्त केली होती कि या सर्व धर्म परिषदेनंतर अशा समाजविघातक विचारांचा अंत होइल. मात्र दुर्दैवाने अमेरिका आणिइंग्लंडची राक्षसी महत्वाकांक्षा आणि हिटलरचा वंशवाद याने दुसर्या महायुद्ध्याची सावली जगावर पडलीच. यातून स्वामीजींच्या  वाक्यातील सत्यता पुन्हा जगाने अनुभवली.

Sectarianism, bigotry, and its horrible descendant, fanaticism, have long possessed this beautiful earth. They have filled the earth with violence, drenched it often and often with human blood, destroyed civilization, and sent whole nations to despair. Had it not been for these horrible demons, human society would be far more advanced than it is now. But their time is come; and I fervently hope that the bell that tolled this morning in honor of this convention may be the death-knell of all fanaticism, of all persecutions with the sword or with the pen, and of all uncharitable feelings between persons wending their way to the same goal.

वेदांताचे सूत्र आणि तत्वमसि ।

हिदु धर्माने ईश्वराचे रूप निर्गुण निराकार आणि सगुण साकार दोन्ही प्रकारे मंजूर केले आहे. याबाबतीत, आमच्या वेद्कर्त्यांमध्ये आजीबात संभ्रम नाहि. मात्र ख्रिश्चन मिशनर्यांनी आमच्या लोकांना सांगण्यास सुरवात केली, कि तुमचा धर्म गोन्धळलेला आहे. तो दगडाचा देव मानतो. दगडाची पूजा करतो. म्हणून तुम्ही मागासलेले आहात.

विवेकांदांनी ‘वेदांत’ म्हणजेच ‘उपनिषदांची’ तत्वे आणि विचार जगाला सांगितले. त्यामुळे जगाला कळले, कि आपण मानतो तसे हिंदू धर्म दगडांमध्ये म्हणजे सगुण आकारामध्ये अडकलेल नसून, “जग हे नाम मात्रांचे आहे ” हे विज्ञानाचे तत्व त्याने मान्य केले आहे, तेच तो सांगतो.

ख्रिश्चन आणि इस्लाम दोन्ही धर्म ईश्वर हि संकल्पना एक तत्व म्हणून मानतात. आणि ती लोकांना सांगण्यासाठी एका प्रेषिताने जन्म घेतला तोच आपल्या धर्माचा उद्गाता हि त्यांची भावना आहे. या अनुषंगाने येशु आणि पैगंबर हे धर्मांचे प्रेषित ठरतात. तसे हिंदू धर्मात नाहीच. अगोदर म्हटल्याप्रमाणे, कोणा एका माणसाने “आता मी हिंदू धर्म लिहावयास बसतो ‘ असे म्हणून वेदांची निर्मिती केली नाही. किंबहुना वेदांची निर्मितीच ज्ञानासाठी झाली आणि असे ज्ञान अंगिकारणारा तो हिंदू धर्मीय झाला. वेदांमध्ये ईश्वर हि संकल्पना सांगितली आहे. अर्थात वेदांच्या निर्मितीचा काळ किमान १००० वर्षांचा असल्याने  प्रत्येक वेदागाणिक काही बदल झाल्याचे दिसतात. मात्र अगोदर पासून रुद्र, विष्णू या देवान्व्यातिरिक्त एक अनामिक सबळ शक्ती कार्यरत आहे हे वेदातही सांगितले आहे. ऋग्वेदाच्या १५०० वर्षांनंतर निर्माण झालेल्या उपनिषदांमध्ये तर या शक्तीचाच विचार केला आहे. हि शक्ती ज्याला “तत्व” असे म्हटले आहे, ते विश्वाच्या निर्मितिअगोदरपासून अस्तित्वात आहे हे उपनिषदे मानतात. यापुढे  जाऊन,हे जे तत्व ते या विश्वाची सर्वोत्तम शक्ती आहे आणि ती सर्वांमध्ये आहे असा अतिशय उच्च विचार उपनिषदे सांगतात. यालाच उपनिषदे तत्वमसि  म्हणजे ते तत्व तू आहेस असे म्हणतात. या तत्वाचा त्या सर्वोच्च शक्तीशी मिलाफ करण्यासाठी ज्ञानाचा मार्ग उपनिषदे सांगतात. त्यामुळे मोक्ष हि पुराणांमध्ये सांगितलेली संकल्पना उपनिषदामध्ये स्वतःतील तत्व  अशा अंगाने येते. शंकराचार्यान्निसुद्धा हेच तत्व मांडले आहे. हिंदू धर्माची हीच खुबी आहे. म्हणूनच कोणाही देवासमोर नतमस्तक होताना आम्हाला दुसर्या देवाचे अस्तित्व अमान्य करावे लागत नहि. बौद्ध माणूस गणपतीसमोर हात जोडणार नाही, पण हिंदू माणसाला बुद्धांच्या मूर्तीपुढे नतमस्तक होताना कसलीही आडकाठी येत नाहि. रामाचे अस्तित्व मान्य करण्यासाठी त्याला बुद्धांना अमान्य करावे लागत नाही, महावीरांना अमान्य करावे लागत नाही किंवा येशूला अमान्य करावे लागत नाही.

या अनुषंगाने, माणूस मग तो कुठल्याही धर्मातील असेल, कुठलेही विचार, पंथ मानणारा असेल, त्याच्या मध्ये या सर्वोच्च शक्तीचा अंश आहे हे हिंदू धर्म मांडतो म्हणूनच विवेकानंद सांगतात, सर्व धर्मांना सामावणारी हि “सर्व धर्मांची आई” आहे.

त्या सर्वोच्च शक्तीची आणि तुमच्यातील तत्वाची सांगड घालण्याचा जो मार्ग तो सर्वोत्तम ज्ञानाचा मार्ग त्याला ‘ब्राह्मण’ असे म्हटले आहे. हा मार्ग, स्वामीजी चार भागात मांडतात. बौद्ध धर्म मोक्षासाठी सर्वसंग परीत्यागाचा मार्ग सांगतो, जैन धर्म देह क्लेशाचा अनवट मार्ग सांगतो, तिथे हिंदू धर्म, राज योग, भाक्तीयोग, ज्ञानयोगआणि कर्मयोग असे चार सुंदर मार्गांचे विवेचन करतो. हेच विवेकानंदांनी सांगितलेले चार योग.

मग जर उपनिषदे निर्गुण निराकार रूप मानतात तर सगुण साकार रूपाचा अट्टाहास कशासाठी? सामान्य लोकांच्या आवाक्यात उपनिषदांचे तत्वज्ञान आणण्यासाठी! जे अथांग अफाट आहे तेच त्या मूर्तीत आहे. म्हणूनच गणपती बसवल्यावर त्याची प्रतिष्ठापना केली जाते. ज्ञानेश्वर विठ्ठलाचे रूप वर्णन करताना साजिरे गोजिरे म्हणतात त्यालाच ते ‘क्षेम देऊ गेले तव मिची मी एकला’ असेही म्हणतात याचे कारण तेच. हा हिंदू धर्माचा भोळसटपणा नाही, उलट उत्तुंग तत्वज्ञान आणि त्याचा सामान्य लोकांसाठी व्यवहारी साक्षात्कार आहे.

हिंदू  धर्म प्रशस्ती

विवेकानंद सांगतात कि “हा तो धर्म आहे ज्याच्यात अज्ञानाला स्थान नाही.” ख्रिश्चन धर्माने धार्मिक आणि अध्यात्मिक पातळीवर सुरुवात करून राजकीय ढवळाढवळ केली. हिंदू धर्माने तसा लपंडाव स्वीकारला नाही . हिंदू धर्म हे हिंदुत्वाचे म्हणजेच राष्ट्रधर्माचे एक रूप रहिले. विवेकानंदानी हे नमूद केले आहे. “हि ती शक्ती आहे जिने मानवतेच्या कल्याणासाठी आणि मानवाला त्याचे अद्वैत रूप सिद्ध करण्यासाठी मदत केली आहे. हा धर्म सांगतो, एकत्र या  ,विभागू नका; मदत करा भांडू नका, जन्माला घाला, विध्वंस करू नका ;  शांतता आणि एकात्मता ठेवा! “

Previous Article

१५ जानेवारी

Next Article

स्वामी विवेकानंद आणि मोहिमेची योजना

You may also like