श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठीचा संघ आज घोषित करण्यात आला असून, मुंबईचा वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूर याला संधी देण्यात आली असल्याने पालघरमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
आगामी काळातील मोठ्या मालिकांच्या पार्शवभूमीवर बीसीसीआयने रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जाडेजाला वन-डे मालिकेत विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. रोहीत शर्माकडे संघाचं उप-कर्णधारपद सोपवण्यात आलेलं आहे.
श्रीलंकेविरुद्ध भारताचा वन-डे संघ
विराट कोहली ( कर्णधार ), शिखर धवन, रोहीत शर्मा ( उप-कर्णधार ), लोकेश राहुल, मनीष पांडे, अजिंक्य रहाणे, केदार जाधव, महेंद्रसिंग धोनी ( यष्टीरक्षक ), हार्दीक पांड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, शार्दूल ठाकूर
- Tags: Shardul Thakur, शार्दूल ठाकूर