येत्या तीन दिवसात राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. येत्या शुक्रवारपासून पावसाचं पुनरागमन होईल असा अंदाज आहे.
कोकण, मध्य महाराष्ट्र, आणि मराठवाड्यात मुसळधार पाऊस होईल असे हवामान विभागाने सांगितले आहे. ह्या पावसामुळे शेतकऱ्यांना पुन्हा दिलासा मिळणार आहे. राज्यभरात आत्तापर्यंत साधारणतः सरासरीपेक्षा निम्मा पाऊस आत्तापर्यंत पडल्याचे वृत्त होते.
मुंबई उपनगरात पुढच्या २४ तासात पावसाची शक्यता आहे. लोकही या पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
एकंदरीत गणरायाच्या उत्सवावेळी राज्यभरात पावसाची हजेरी लागणार असे दिसते.