Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

झाडे लावा – झाडे जगवा

Author: Share:

देईन मी सावली
जर लावलेस तू मला !

देईन मी फळे
जर लावलेस तू मला !

देईन मी फुले
जर लावलेस तू मला !

देईन मी प्राणवायू
जर लावलेस तू मला !

शोषून घेईन मी दुषित वायू
जर लावलेस तू मला !

वाढवेल श्रुष्टीचे सौदर्य
जर लावलेस तू मला !

राखेन पर्यावरणाचा समोतलं
जर लावलेस तू मला !

पडेल भरपूर पाऊस
जर लावलेस तू मला !

सुटेल थंडगार वारा
जर लावलेस तू मला !

भागवेल भुकेची तहान
जर लावलेस तू मला !

वाढवेल अन्नाची गोडी
जर लावलेस तू मला !

पक्षांना होईल घर
जर लावलेस तू मला !

पक्षुनां होईल चारा
जर लावलेस तू मला !

होईन झोक्यांचा आधार
जर लावलेस तू मला !

जर एवढं सगळं देतो मी भरभरून
तर लाव आणि जगव तू मला !!

महेश भा. रायखेलकर
९३२६६१२४३६

Previous Article

जोगेश्वरीच्या चिंतामणीचे जल्लोषात स्वागत

Next Article

लपंडाव

You may also like