केदार शिंदें बोलणार केम छो…

Author: Share:

मुंबई : सही रे सही, लोचा झाला रे, श्रीमंत दामोदर पंत, गेला उडत, तू तू मी मी असे एकापेक्ष एक दर्जेदार नाटकं देणारे केदार शिंदे आता गुजराती प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाले आहेत.

याआधी त्यांनी ‘राजू राजा राम और मैं’ या हिंदी नाटकाने प्रेक्षकांचं मनोरंन केलं होतं. आता ते ‘नाटक ना नाटक नु नाटक’ या नाटकाद्वारे गुजराती प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत. ‘द प्ले दॅट गोज राँग’ या गाजलेल्या अमेरिकन नाटकाचा हा रिमेक आहे. अभिनेते शर्मन जोशी यांनी या नाटकाची निर्मिती केली आहे.

आतापर्यंत मराठी आणि हिंदी रसिकांच्या मनावर राज्य करुन मराठमोळे केदार शिंदे केम छो बोलत गुजराती प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. या स्मार्ट कलाकाराला खुप खुप शुभेच्छा.

Previous Article

स्वातंत्र्यदिनानिमित्त गुगलची भारताला सलामी

Next Article

स्वातंत्र्य म्हणजे विशेषतः स्त्री साठी

You may also like