स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला श्रीलंकेचा १ डाव १७१ डावांनी खुर्दा करत, भारतीय पुरुष क्रिकेट संघाने भारतीयांना फार सुंदर भेट दिली आहे. या विजयाबरोबर ही मालिका भारताने ३-० अशी खिशात टाकली आहे.
पहिल्या डावात श्रीलंकेला फॉलोऑन दिल्यावर, श्रीलंकेचा दुसऱ्या डावात पहिला बाली लवकर गेला होता. उमेश यादव ने उपल तरंगांचा त्रिफळा उडवीत श्रीलंकेची अवस्था १९ धावत एक बाली अशी केली होती. आज त्यांचा डाव ७४.३ षटकात १८१ धावात आटोपला.
यावेळेस रविचंद्रन अश्विन ने ६८ धावत ४ बाली घेतले तर वेगवान गोलंदाज महंमद शामीने ३२ धावत ३ बळी घेत श्रीलंकेला गार केले. उमेश यादवने २ तर मागच्या डावातील हिरो कुलदीप यादव ने १ बळी घेतला.
श्रीलंकेला श्रीलंकेत दोन मालिकांमध्ये पराभूत करणारा विराट कोहली पहिला भारतीय कर्णधार बनला आहे.