भारतातील बेरोजगारी; एक घातक समस्या

Author: Share:

देशातील बेरोजगारी हि सर्वात बिकट समस्या झाली आहे. भारतात बहुसंख्य तरुण बेरोजगार आहेत. विकसित अन विकसनशील देशांमध्ये हि समस्या आभासून उभी राहील आहे. इतर काही सामाजिक समस्यांचा बेरोजगारीशी जवळचा संबंध आहे. देशाचा विकास दर, वाढती लोकसंख्या, जातीय व्यवस्था यांचा परिणाम बेरोजगारीवर खूपच अधिक प्रमाणावर आहे. म्हणून या विषयावर अभ्यास करणे अन हा विषय जाणून घेणे आवश्यक आहे.

अमेरिकासारख्या विकसित देशात पण ६.७ दशलक्ष लोक बेरोजगार आहेत. काळ्या लोकांचा बेरोजगिरीचा दर ७.७ %आहे तर गोऱ्या लोकांचा बेरोगारीचा दर ३.५ आहे. अमेरिकेतही सुशिक्षित तरुण हे आपल्या कौशल्य प्रमाणे काम शोधतात. नौकरी आपल्या योग्यतेने प्रमाणे न मिळाल्या मुळे हा तरुण बेरोजगार राहतो. हा तरुण वर्ग बेरोगरीचा दर वाढण्याचं मुख्य कारण आहे. चीन मध्ये हि बेरोजगारीचा प्रमाण खूप आहे. चीन मध्ये ९.८२ दशलक्ष लोक बेजगार आहेत. भारताचा बेरोजगाराचा दर ३.४६% आहे. जगभरात दक्षिण आफ्रिका येथील मौरिटानिया मध्ये सर्वात जास्त लोक बेरोजगार आहेत.आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेच्या आकडेवारी नुसार जगभरात २० करोड लोक बेरोजगार आहेत. जगात सर्वात कमी बेरोजगारी दर नॉर्वे या देशात आहे. जगात सर्वात जास्त बेरोगारीचे प्रमाण दक्षिण आफ्रिका, ग्रीस, स्पेन, इराक, इजिप्त या देशांमध्ये आहे.


असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज 

www.facebook.com/SmartMaharashtraOnline 


प्राचीन काळी भारतात गुरुकुल पद्धत होती. ऋषीमुनी त्याकाळी सशिक्षणाची परीक्षा घेऊन ठरवत असत शिष्य कुठल्या कामात पारंगत आहे.त्यानुसार ऋषीमुनी काम देत असत. स्वतंत्र पूर्व काळात ब्रिटिशांनी त्यांच्या सोयीनुसार गुरुकुल व्यवस्था मोडित काढली. गुरुकुल व्यवस्था मोडीत काढून विद्यापीठ उभी केली. ब्रिटिशांना भारतावर राज्य करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात कारकुनांची आवश्यकता होती. त्यामुळे त्यांनी त्याच प्रकारची शिक्षण व्यवस्था उभी केली. स्वातंत्रानंतर आपणहि हीच व्यवस्था कायम ठेवली.यांना प्रशिक्षित करण्याची व्यवस्था तयार केलीच नाही. पांढरपेशी नौकरीला सन्मान मिळाल्यामुळे बरेच व्यवसाय कनिष्ठ ठरले.

शेती व्यवसाय पण कनिष्ठ ठरवलं गेला. आजचा विचार केला तर बराच तरुण वर्ग बेरोजगार आहे, कारण त्याला योग्य ते मार्गदर्शन नाही. आजची शिक्षण पद्धती व्यावसायिक दृष्टिकोनातून विचारकरनारी असल्यामुळे आजचा तरुण वर्ग बेरोजगार आहे.भारतातली जातीव्यवस्था यातील एक मुख्य कारण असून ठराविक जातीव्यवस्थेकडे ठराविक काम जाते त्यामुळेही बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. उदाहरणार्थ न्हाव्याच केस कापेल, धोब्यानेच कपडे धुणे वगैरे. उद्योगधंदे ज्या प्रमाणात वाढावेत त्याप्रमाणात वाढत नाहीत. आपली अर्थ व्यवस्था खूपच धीम्या गतीने सुरु आहे. भारताची अर्थ व्यवस्था कृषीप्रधान असून हि कृषीविषयक आधुनिक तंत्रज्ञान भारताकडे अजूनहि उपलब्ध नाही. इस्राईलसारख्या छोट्याश्या देशात आज शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञाना आहे.

जलसंधारण त्याठिकानि खुपमोठ्या प्रमाणावर आहे. पाण्याविषयीचे नियोजन अभ्यासन्यासारखे आहे. मराठवाड्यातील कडवंची गावाचे उदाहरण देता येईल मृदासंधारण अन जलसंधारण यादोन्हीच्या आधारे या गावाचा कायापालट करण्यात आलाय.

आज भारतात एकत्र कुटुंब पद्धत आहे. एकत्रकुटुम्ब पद्धत असल्यामुळे कुटुंबातील कुटुंब प्रमुखावरच अवलंबून राहिले जाते किंवा जो कमावतो त्याव्यक्तीवररच अवलंबून राहहले जाते. औद्योगिक विकासामुळे छोट्या उद्योग यांचे उत्पादन कमी झाले त्यामुळे छोट्या उद्द्योगातील कारागिरांना काम मिळणे अवघड झाले आहे.

आज माहिती तंत्राद्यातील सुशिक्षित तरुण शहरात काम मिळेल याअपेक्षेने शहरात येत आहे. ऑटोमेशन मुळे त्याच्यातील रोजगाराचे प्रमाण कमी झाले आहे. स्वयंचलित तंत्रज्ञान दहा व्यक्तीचे काम स्वतः करून घेत असल्यामुळे आज तिथेही बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. अलीकडचेच उदाहरण आहे ७० जागांसाठी महाराष्ट्र राज्य सेवा आयोगाकडे लाखावर अर्ज येत आहेत. भारतात अशी परिस्थिती आहे कि चपराशीच्या जागेसाठी पण सुशिक्षित तरुण वर्ग अर्ज करत आहे.

जेटलींच्या ट्विटचा संदर्भ देत अमित शाह म्हटले कि तरुणाईने स्वयंरोजगाराकडे वळलं पाहिजे. व्यवसाय कुठलाही असो निसंकोच तो करायला हवा. कारण बेरोजगारीपेक्षा कधीही पकोड्याची गाडी टाकलेली कधीही चांगली. आकड्याचे गणित बघितले तर २००८ मध्ये ४.५ % तरुण बेरोजगार होता. तर २०१६ चे आकडे बघितले तर ३.५% तरुण बेरोजगार आहेत. १५ ते ३० यवयोगटावर शासनाने योग्यते नुसार लक्ष दिले पाहिजे. हल्लीच्या शासनाकडून स्वयंरोजगाराचे चांगले कार्यक्रम हाती घेतले जात आहेत. कौशल्य विकाससारख्या शासनाकडून योजना राबवल्याजात आहेत. त्यामुळे रोजगार निर्मिती होण्यासाठी वाव मिळत आहे.

बेरोजगारीचे प्रमाण कमी करायचे असेल वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रण आणले पाहिजे. शिक्षण सर्वांना उपलबद्ध करून देणे आवश्यक आहे. सध्याच्या शिक्षण पद्धतीत आवश्यकतेनुसार बदल करणे गराजेंचे आहे. कौशल्य तंत्र शिकवले पाहिजे. त्यामुळे कुशल कामगार निर्मितीला मदत होईल. यामुळे जे विद्यापीठात शिक्षण घेऊ शकत नाही किंवा ज्यांना पुरेशी श्रेणी प्राप्त नाही यामुळे अशा लोकांना फायदा होईल. ज्यांचे उच्चशिक्षण पूर्ण झाले आहे त्यांना तंत्र शिक्षणामुळे खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होईल. यामुळे नौकरी उपलब्ध होण्यास मदत होईल.बेरोजगार तरुणाने कधीही कुठलाही व्यवसाय निसंकोचपाने स्वीकारायला आहे. अन जोडधंद्याविषयी नवीन नवीन कल्पना मनात आणून त्यांची पूर्तता केली पाहिजे.

१५ ते ३० या वयोगटातील तरुण भारताला बेरोजगार राहणं खूप घातक ठरू शकत. बेरोजगारीची समस्येचे निराकरण जोपर्यंत होता नाही तोपर्यत भारताचे भविष्य उज्वल होऊ शकत नाही. नौकरी नसलेल्या तरुणाला योग्य प्लॅटफॉर्म न मिळाल्यास देशात शांतता अन समृद्धी टिकू शकत नाही. युवक चुकीच्या दिशेने जात आहेत.

लेखक: वीरेंद्र सोनावणे


असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज 

www.facebook.com/SmartMaharashtraOnline 


Previous Article

त्रिपुरा यशानंतर आता कर्नाटक जिंकणार का भाजप?

Next Article

अनाथांची कैवारु कांचन वीर

You may also like