मुंबई: बैलगाडी शर्यतीला यंदाही परवानगी हायकोर्टाने नाकारली आहे. राज्य सरकारने जरी अधिसूचना काढली असली तरी बैलगाडी स्पर्धांदरम्यान बैलांना इजा होणार नाही याबाबत सरकार नियमावली तयार करुन सादर करत नाही, तोपर्यंत बैलगाडी स्पर्धांना परवानगी नाही असे हायकोर्टाने स्पष्ट केले आहे.
राज्य सरकारनं बैलगाडी स्पर्धांसाठी काढलेल्या अधिसूचनेला मुंबई हायकोर्टात आव्हान देणारी याचिका सामाजिक कार्यकर्ते अजय मराठे यांनी दाखल केली होती. त्या याचिकेवर सुनावणी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. बैलगाडी स्पर्धा हा क्रूर खेळ असून यामध्ये बैलांना इजा होत आहे. तसेच बैल हा धावण्याकरता नाही तर कष्टाची कामं करण्यासाठीचा प्राणी आहे असं मराठे यांचं म्हणणं आहे.