खडवलीच्या अनाथाश्रमात झुंज प्रतिष्ठानची संवाद मुशाफिरी

Author: Share:

मुंबई: स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून झुंज प्रतिष्ठानने खडवली येथील पसायदान बालकाश्रमाला भेट देऊन तेथील मुलांसोबत संवाद साधला. पसायदान बालकाश्रमाचे बबन शिंदे यांनी झुंजच्या शिलेदारांना माहिती देताना प्रत्यक्ष काम करताना आलेले अनुभव कथन केले.

अनेकदा रेल्वेस्टेशनवर बरीचशी मुलं भिक मागताना, कचरा वेचताना, नशा करताना दिसून येतात. या मुलांशी संवाद साधून पसायदान फाउंडेशनचे कार्यकर्ते त्यांना पसायदान बालकाश्रमात आणून शिक्षणाची गोडी लावतातचं शिवायं त्यांच्या घरी नेऊन सोडण्याचं काम करतात.

पसायदान बालकाश्रमातील मुलांची भेट घेऊन झुंजच्या शिलेदारांनी त्यांच्याशी गप्पा मारल्याचं शिवाय त्यांच्यासोबत गाणीही म्हटली. यावेळी मुलांच्या भवितव्यासंदर्भातील अनेक शंका, प्रश्न झुंजच्या शिलेदारांनी पसायदान बालकाश्रमाचे बबन शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांना विचारले.

झुंजने आयोजित केलेल्या या संवाद मुशाफिरीमध्ये राहुल हरिभाऊ, जयेश शेलार, रूपेश पाठारे, किरण धुमाळ, जयेश चौधरी, मैनुद्दीन मुल्ला, शनी अंबारे, हर्षद पाटील, शिवाजी पाटील, अल्केश शेलार,विराज परब, सुजय परब, साईनाथ सोनावणे सहभागी झाले होते. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून झुंज प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या या संवाद मुशाफिरीची सांगता मिठाईने सर्वांच तोंड गोड करुन झाली.

Previous Article

उत्सवाचा कुत्सव होऊ नये…

Next Article

मातोश्री वृध्दाश्रमात तरुणाईने रंगवली “गप्पा, गोष्टी अन् बरचं काही” या कार्यक्रमाची मैफिल

You may also like