प्रबोधक सन्मान 2017 उत्साहात संपन्न…

Author: Share:

प्रबोधक सन्मान 2017 उत्साहात संपन्न…

दिनांक 14 जानेवारी 2017 रोजी पु.ल देशपांडे अकादमी, मिनी थिएटर, प्रभादेवी येथे प्रबोधक सन्मान 2017 दिग्गजांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला.

विसुभाऊ बापट यांना कला सन्मान, दीपक पवार यांना समाजसेवचांगली सन्मान, किरण शेलार यांना पत्रकारिता सन्मान, परीक्षित शेवडे यांना वक्तृत्व सन्मान, निरंजन लेले यांना संगीत सन्मान आणि स्व. अश्विनी एकबोटे यांना विशेष कला सन्मान ज्येष्ठ अभिनेते श्री. किशोर प्रधान यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात नृत्यसंस्कार कथक अकॅडेमिच्या सर्वेसर्वा राजश्री ओक यांच्या विद्यार्थिनींनी शास्त्रीय कथक शैलीत मदनमोहन स्तोत्र सादर करून केली. त्यानंतर अनघा पुराणिक यांचे शास्त्रीय गायन झाले व कार्यक्रमाची सांगता विश्वास सोहोनी लिखित, दिग्दर्शित व अविष्कार निर्मित दीर्घाकाने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनघा मोडक आणि दुहिता सोमण यांनी केले. प्रबोधकचे अध्यक्ष श्री. हर्षद माने यांनी प्रबोधकच्या कार्याची माहिती सांगितली. तसेच दीप्ती शिंदे यांनी आभार प्रदर्शन केले.

सर्व सन्मानमूर्तीनी आपले मत व्यक्त केले. स्व. अश्विनी एकबोटे यांचे पती श्री. प्रमोद एकबोटे यांनी सन्मान स्वीकारला. यावेळी बोलताना अश्विनीताईंच्या आठवणीने त्यांचे डोळे पाणावले. श्री. किशोर प्रधान यांनी आपल्या विनोदी शैलीने अध्यक्षीय भाषण करत कार्यक्रमात रंगत आणली.

Previous Article

डोंबिवली विषयी

Next Article

मोदी शासनाची ३ वर्षे