राज्यभरात पावसाची वाईल्ड कार्ड एंट्री

Author: Share:

मुंबई: पावसाळा सुरु होऊन दोन महिने होत आले होते, पण पावसाने हवी तशी साथ दिली नाही. यामुळे नागरिक आणि विशेषतः शेतकरी वर्ग चिंताग्रस्त होता. पण गेले दोन दिवस पाऊसाने आपले कर्तव्य बजावण्यासाठी जणू वाईल्ड कार्ड एंट्री घेतली आहे.

खेड तालुक्यातील चास कमाण धरणातून २५०० क्यूसेक्सने पाण्याचा विसर्ग भीमा नदी पात्रात सुरू आहे. आंबेगाव तालुक्यातील डिंबा धरणातूनही ३००० क्यूसेक्सने घोड नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याळे दोन्ही तालुक्यातील गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. लातूर, उस्मानाबाद, तुळजापूर बीड, नांदेडमध्ये सुद्धा पावसाने हजेरी लावली आहे. परभणी,जालना,औरंगाबाद, हिंगोली इथंही पावसाने हजेरी लावली. मराठवाडा विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, महाबळेश्वरमध्ये पावसाचा जोर वाढत आहे.

येत्या चार दिवसात चांगला पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला होता. नांदेड जिल्ह्यातील १६ पैकी १३ तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. महापालिका आयुक्त आणि अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या घरात पावसाचं पाणी शिरलं आहे. औरंगाबादमध्ये ३५.४७ मिमी, जालना ३२.१९ मिमी, परभणी ४२.२१ मिमी, हिंगोली ४४.९६, नांदेड १००.८६, बीड ६८.४७, लातूर १०४.५५ मिमी, उस्मानाबाद ६५.०९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. बीड जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत 49.15 टक्के पावसाची नोंद झाली आहे. असाच पाऊस सुरु राहिला तर पाऊस गणेशोत्सव गाजवणार आहे.

Previous Article

१५ ऑगस्टला हिंदी-चीनी सैनिकांमध्ये झाला होता तणाव; हा व्हिडिओ पाहा

Next Article

मिरा-भाईंदर निवडणूक: मतदार यादीत घोळ; पुन्हा मतदारांची निराशा

You may also like