आजची तरुणाई आणि सावरकर…

Author: Share:


असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज 

www.facebook.com/SmartMaharashtraOnlineसावरकरांना समुद्रमार्गे भारतात आणले जात होते. ८ जुलै १९१० रोजी जहाजाच्या शौचालयाच्या खिडकीतून त्यांनी समुद्रात उडी मारली. खाऱया पाण्यातून फ्रान्सच्या हद्दीत प्रवेश केला. त्या क्रांतिकारी उडीला आज शंभर वर्षे होत आहेत.

अखंड आणि स्वतंत्र भारताच्या निर्मितीसाठी स्वत:च्या आयुष्याचा होम करणारे स्वाभिमानी देशभक्त म्हणजेच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. स्वातंत्र्य चळवळीत स्वातंत्र्यवीर सावरकरांनी उभारलेला लढा राष्टÑद्रोह ठरवत ब्रिटिशांनी त्यांना या आरोपाखाली अटक केली. सावरकरांना जेव्हा समुद्रमार्गे भारतात आणले जात होते त्या वेळी ८ जुलै १९१० रोजी जहाजाच्या शौचालयाच्या खिडकीतून त्यांनी समुद्रात उडी मारली. खार्‍या पाण्यात पोहून त्यांनी फ्रान्सच्या हद्दीत प्रवेश केला. दुर्दम्य इच्छाशक्ती असलेल्या सावरकरांनी मारलेल्या त्या क्रांतिकारी उडीला आज शंभर वर्षे पूर्ण होत आहेत.

नाशिक जिल्ह्यातले भगूर हे सावरकरांचे जन्मगाव. २८ मे १८८३ रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांच्या जन्मानंतर १४ वर्षांनी घडलेल्या घटनेनेच सावरकरांच्या हृदयात राष्ट्रप्रेमाची ज्योत पेटवली. १८९६-९७ मध्ये राज्यात सर्वत्र भीषण दुष्काळ पडला होता. दुष्काळाच्या जोडीला आलेल्या प्लेगने जनता हैराण झाली होती. मात्र ब्रिटनची राणी आपल्या कारकीर्दीची साठ वर्षे पूर्ण झाल्याचा आनंदोत्सव साजरा करण्यात मश्गूल होती. या प्रकाराची चीड येऊन त्यांचा सूड घेण्याचे चाफेकर बंधूंनी ठरवले आणि ते त्यांनी कृतीतही उतरवले. राणीच्या कार्यक्रमातील मेजवानी आटोपून परतणार्‍या रँड आणि आयर्स्ट या ब्रिटिश अधिकाºयांवर त्यांनी गोळ्या झाडल्या. या गुन्ह्यासाठी त्यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. या सर्व घटनाक्रमाने अस्वस्थ झालेल्या सावरकरांनी हुतात्मा चाफेकर बंधूंचे अपूर्ण कार्य पूर्ण करण्याची आणि त्यासाठी सर्वस्व पणाला लावण्याची शपथ दुर्गादेवीसमोर घेतली. देशभक्तांना फासावर लटकवून त्यांची जीवनयात्रा ब्रिटिशांनी संपवली; पण त्यातूनच क्रांतिकारकांची नवी पिढी उभी राहिली.

देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामात सर्वस्वाची आहुती देणाºया सावरकरांनी अनेक स्वातंत्र्यवीरांची फौजच तयार केली होती. क्रांतिकारी विचारांच्या मांडणीतून त्यांनी देशातल्या तरुणांना स्वतंत्र भारताच्या निर्मितीसाठी प्रेरणा दिली. सावरकर हे असे पहिले सेनानी होते, ज्यांनी १८५७ च्या बंडाला ‘स्वातंत्र्यसंग्राम’ म्हणून संबोधले होते. सावरकरांच्या याच विचारांपासून प्रेरणा घेऊन मदनलाल धिंग्रा यांनी लंडनमध्ये कर्झन वायलीवर गोळीबार करून त्याला यमसदनी पाठवले.

काही तरुणतरुणी नक्कीच सावरकरांच्या विचारांनी भारावून जाते. तरुणाईला खरी देशभक्ती शिकवणारे सावरकरांचे विचार नक्कीच प्रेरणादायी आहेत.भविष्यात आजच्या तरुणाईने सावरकर नक्कीच वाचावे.आजच्या हिंदू समाजासाठी तर सावरकरांचे विचार म्हणजे बरच काही शिकवून जाणारे आहेतच.विज्ञाननिष्ठ निबंधांतर गायीविषयी सांगण्यात आले आहे. तो विचार सध्यातरी कुणाला पटणार नाही पण योग्य तेच सावरकरांनी सांगितले आहे. अस्पृश्य निवारणाच्या कार्यात सावरकरांनी रत्नागिरीत एक सामाजिक आन्दोलनच उभारले होते.अस्पृश्यांनाही मंदिर प्रवेश करून दिला.पूजेचाही अधिकार अस्पृश्यांना मिळाला.

अस्पृश्यांतील हि अस्पृश्यता नष्ट व्हावी ह्या विचारांचे सावरकर होते. आजचा तरुण इतर गोष्टीत पटाईत असतोच. उदारणार्थ फेसबुक ट्विटर व्हाट्स अँप यांसारखे सोशल मीडिया वापरण्यात पटाईत आहे.काही महाविद्यालयीन तरुण तर मुली पटवण्यात पटाईत असतात. पण भूतकाळात सावरकरांसारखे काही महान स्वतांत्रवीर होऊन गेलेत यांचं खर आहे का ? त्या काळचा तरुण सावरकरांच्या विचारांनी प्रेरणा घेत होता तर आजचा तरुण आपण विचार करू शकता.महाविद्यालयातील ते दिवस म्हणजे महाविद्यालयातील तरुणांचा अभ्यासाचा काळ अभ्यास करून नाव कमावण्याचा काळ पण महाविद्यालयीन तरुण नक्की कशात हरपलंय ते बघणे गरजेचे आहे.

लहान पनापासूनच सुसंस्कृत होणे गरजेचे आहे. तरुणाईची शक्ती म्हणजे आपल्या भारत तरुण असल्याचा पुरावा. काही तरुणांना ह्याबाबत थोडे वाईट वाटेल पण हे खर आहे. स्वातंत्रपूर्व काळात त्यावेळचा तरुण लढला नसता तर आपल्याला चांगलाच माहित आहे कि आज काय परिस्थिती राहिली असती. आजच्या तरुणाईची देशभक्ती फक्त समाजातील वृंन फेडणे, समाज प्रबोधन करणे, सुशिक्षित तरुणांनीं लहायला शिकून समाज प्रबोधन केले पाहिजे.व्यसनापासून दूर राहिले पाहिजे.रोजगार निर्मितीचे नवनवीन उपाय शोधून काढले पाहिजेत.

‘आत्मसाक्षात्कारानंतरही जर देशवासीय तुमचा अपमान करत असतील, तुम्हाला त्रास देत असतील तर तुम्ही प्रतिकार करू नका. जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत त्यांची सेवा करा,’ या गुरू गोविंदसिंग यांच्या शब्दाला अनुसरूनच सावरकरांनी अखेरपर्यंत आपले वर्तन ठेवले. सामाजिक समरसता आणि अखंड राष्ट्रनिर्मितीच्या मार्गावर चालताना त्यांना खूप मानहानी, अपमान सोसावे लागले. मात्र, ते कधीही आपल्या कर्तव्यापासून ढळले नाहीत. स्वतंत्र आणि अखंड भारतासाठी जीवन अर्पण करणाºया या थोर सेनानीने २६ फेब्रुवारी १९६६ ला या जगाचा निरोप घेतला. या राष्ट्रनायकाप्रती कृतज्ञता व्यक्त करूया.

लेखक: विरेंद्र सोनावणेअसे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज 

www.facebook.com/SmartMaharashtraOnline 

Previous Article

वेद अपौरुषेय, ईश्वरनिर्मित आहेत का? भाग २

Next Article

सन २०२२ पर्यंत शेतकऱ्याचे उत्त्पन्न दुप्पट करण्यासाठी भाजपा शासन कटिबद्ध – सुरेश बाबा पाटील

You may also like