कवी, कविता आणि मानधन

Author: Share:

हल्लीच टी.व्ही.वर एक मराठी मालिका पाहात होतो त्यातील नयिकेची कोणत्यातरी मासिकात एक कविता प्रकाशित झालेली असते आणि त्या मासिकाच्या संपादकाने तिला त्या मासिकाची प्रत, आभाराचे पत्र आणि दिडशे रूपये पाठवलेले असतात असे दृश्य दाखविलेले होते. ज्या कोणी ही मालिका लिहिली असेल एकतर तो किंवा ती कवी असेल अथवा त्यांनी एखादया कवी सोबत चर्चा केलेली असावी.

मी एक कवी आहे, उत्तम कवी आहे असं मी नाही म्ह्णणार पण आजही कवीला त्याच्या प्रकाशित झालेल्या कवितेचे मानधन म्ह्णून दिडशे रूपयापेक्षा जास्त मानधन दिलं जात नाही हे मी खात्रीने सांगू शकतो. उलट आजही आपली कविता प्रकाशित व्हावी म्हणून कित्येक कवीच हजार-पाचशे रूपये खर्च करायला तयार असतात. ‘माणूस प्रेमात पडला की कवी होतो’ असं म्ह्णतात. आपल्या देशात प्रेमात पडणार्‍यांची कमी नाही त्यामुळे सहाजिकच कवींची ही कमी नाही. मला आजही स्वतःला कवी म्ह्णवून घ्यायला संकोच वाटतो त्याउलट स्वतःला लेखक म्ह्णवून घेताना मला अभिमान वाटतो.

माझी कविता मी कोणाला ही रस्त्यावर अथवा कोठे ही कोणीही भेटला असता मला ती ऐकवणं शक्य नसत, मनात असतानाही कारण माझ्या कविता माझ्या तोंडपाठ नसतात. त्याउलट रस्त्यात मी कोणासोबत ही एक लेखक म्ह्णून कोणत्याही विषयावर तासन-तास चर्चा करू शकतो. माझ्या मते व्यक्तीशः जे प्रेमात पडल्यामुळे कवी होतात ते खरे कवी नसतात. ज्याला झोपेतून उठवून एखादया समस्येवर कविता लिहायला सांगितली आणि ती त्याने लिहली तर तो खरा कवी.


असे दर्जेदार साहित्य वाचण्यासाठी आमचे पेज LIKE आणि Follow करा: https://www.facebook.com/SmartMaharashtraOnline/


हल्ली पैसे मिळविण्यासाठी कोणीही कविता लिहीत नाही. हल्ली कविता हया एकतर प्रसिध्दीसाठी लिहल्या जातात अथवा मानसिक समाधनासाठी. देशात प्रत्येक वर्षी भाराभर कविता संग्रह प्रकाशित होतात. त्यातील बहूतेक कवितासंग्रह कवी स्वखर्चाने प्रकाशित करतात. त्याबदल्यात त्यांना फायदा होणं तर दूर राहीलं त्यांचे खर्च केलेले पैसे ही डुबतात. त्या प्रकाशित झालेल्या कवितासंग्रहातील कविता उत्तम असल्या की वा! वा! मिळते आणि त्याच कविता कवितेची जान नसणार्‍याच्या हाती पडल्या तर कवीचा उद्दार होतो.

मी तर काही असे कवी पाहिलेत की ते आपल्या प्रकाशित झालेल्या कविता आपल्या कुटुंबियांच्या हाती पडू नये म्ह्णून धडपडत असतात त्यालाही कारण एकच अर्थकारण ! कविता लिहिणे म्ह्णजे रिकामटेकडया लोकांचा उदयोग असा गैरसमज सर्वदूर पसरलेला आहे. माझ्या प्रेमकविता वाचून कोणालाही असे वाटेल की माझा कधी तरी प्रेमभंग झाला असावा. पण रोज नव्याने कोणाच्यातरी प्रेमात पडणार्‍यांचा कसला होतोय प्रेमभंग ! असो आपला मुद्दा मगे पडला कवीच्या मानधनाचा मी माझ्या मासिकात माझ्या अनेक कवी मित्रांच्या कविता प्रकाशित करतो पण मानधन मिळणार नाही हे मी स्पष्ट सांगतो आणि मी स्वतः कवी असल्यामुळे शंभर रूपये मानधन देण हा मला कवी आणि कवितेचा दोघांचाही अपमान वाटतो.

एका कवितेसाठी शंभर रूपये मानधन घेण्यापेक्षा ते न घेतलेले उत्तम निदान समाजासाठी काहीतरी मोफत केल्याचे समाधान. माझ्या कवितांना मिळालेल्या मानधनाचे पैसे संग्रही ठेवावे असे मी ठरवले होते पण ते शक्य काही झाले नाही. एका कवीसंमेलनाला जाण्यासाठी जो कवी दोनशे ते हजार रूपये खिशातले खर्च करून जातो, त्याला त्याच्या कवितेला मानधना पोटी मिळालेल्या शंभर-दोनशे रूपयाचे मूल्य ते काय ? म्हणूनच हल्ली दिवाळी अंकात उत्तमोत्तम कविता वाचायला मिळत नसाव्यात. मला वयक्तीशः असं वाटत कवीला मानधन दयायचेच झाले तर ते कमीत- कमी पाचशे रूपये तरी असावे भले त्या बदल्यात त्या कवीच्या पाच कविता घेतल्या तरी चालू शकतात. आमच्यासारखे जे संपादक पदरमोड करून मासिक काढत असतात त्यांनी मानधन देण्याच्या भानगडीत न पडलेलेच बरे. पण ज्यांना साहित्यातून आर्थिक फायदा होत असतो त्यांनी मानधन दयायलाच हवे.

चित्रपटासाठी एक गाणं लिहणार्‍याला हजारो रूपये दिले जातात पण ते भाग्य हजारो कवींपैकी एखादया कविला लाभत. आमच्यासारखे काही महाभाग कवी घाम गाळून कमाविलेले हजारो रूपये खर्च करून एक-दोन वर्षे आड आपला कवितासंग्रह स्वखर्चाने प्रकाशित करत असतात कोणत्याही आर्थिक बाबींचा विचार अजिबात न करता. असं असताना मला माझ्या कवितेला मानधन म्ह्णून मिळालेल्या शंभर-दोनशे रूपयाचे महत्व ते काय असणार ? समाजातील सर्वांनीच आपले मूल्य ठरविलेले आहे. मग कविंनी ही आता स्वतःच मूल्य ठरवायला नको का ?

लेखक – निलेश बामणे,

गोरेगांव ( पूर्व ), मुंबई-65.

मो. 8652065375 / 9029338268


असे दर्जेदार साहित्य वाचण्यासाठी आमचे पेज LIKE आणि Follow करा: https://www.facebook.com/SmartMaharashtraOnline/


Previous Article

पंडिता रमाबाई सरस्वती

Next Article

धर्मसत्ता आणि राजसत्ता

You may also like