Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

जागतिक हवामान दिन

Author: Share:

हवामानाबाबत जगातील लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावी, लहानांपासून ते वयोवृद्धांना हवामानाचे महत्तव समजावे. हवामान अनुकूल राहण्यासाठी काय दक्षता घ्यावी, कोणकोणत्या योजना करायल्या हव्यात याविषयी जनजागृती व्हावी, या उद्देशाने २३ मार्च हा दिन जागतिक हवामान दिन साजरा केला जातो.

गेल्या चार दशकांच्या तूलनेत मागच्या दशकात हवामानात झालेले बदल, हा चिंतेचा विषय बनलेला आहे. हवामान बदलाच्या परिणामांमुळे भारतातच नव्हे तर जगभरात शेतीक्षेत्र ग्रासले आहे. भविष्यातही हवामान बदलाचे परिणाम कमी-जास्त प्रमाणात प्रभाव दाखवतच राहतील. यामुळे आपण संभाव्य परिस्थितीचा वेध घेऊन आपात्कालिन उपाययोजनांसाठी तयार राहणे आवश्यक आहे. विसाव्या शतकात मानवाचे विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात प्रगती केली. परंतू या प्रगतीसोबतच हवामानातील बदल व दिवसेंदिवस वातावरणातील कमी होणारा ओझोनचा थर या समस्या आवासून उभ्या आहेत. जीवसृष्टीवरील वाईट परिणामांच्या स्वरुपात आपण ते अनुभवत आहोत. हवामानातील बदल हा जागतिक तापमानवाढीमुळे होणारा सर्वाधिक चिंताजणक परिणाम आहे. अनेक देशांत, खासकरुन युरोप व अमेरिकेसारख्या देशात हवामानातील बदल स्पष्टपणे जाणवत आहेत.

२०१०-१३ या काळात सर्वाधिक हवामानबदलाच्या अनेक घडामोडी घडून आल्या. या घडामोडींनुसार, २०१० व २०११ हे वर्ष गेल्या १०० वर्षातील सर्वाधिक उष्ण वर्ष ठरले. २०१० ते २०१३ ही सर्वाधिक हिमवादळे न थंडीची वर्ष ठरली. २०१० ते २०१३ हा अत्याधिक पावसाचा व वादळांचा काळखंड ठरला. याचबरोबर भारतात दिवस व रात्रीच्या तापमानात वाढ झाली. मान्सूनही लहरी बनला. जागतिक हवामानातील या बदलांची आपण योग्य दखल व त्यासंदर्भात योग्य उपाययोजना केल्या नाहीत तर येत्या काही काळात पृथ्वीवरील जीवसृष्टीसमोर संकट ओढावेल.

संदर्भ – मराठीमाती. कॉम

Previous Article

रामलीला मैदानावर आजपासून अण्णांचं आंदोलन

Next Article

२३ मार्च 

You may also like