जागतिक वन दिन

Author: Share:

वनाचे मह्त्तव व त्याचे संवर्धन या विषयी जनजागृती करण्यासाठी दरवर्षी २१ मार्चला जागतिक वन दिन साजरा केला जातो. जंगलाबाबत आस्था आणि जंगलतोडीमुळे होणाऱ्या हवामानातील बदलांबद्दल चिंता वाटत असणाऱ्या सर्वांना जागतिक पातळीवर व्यासपीठ मिळावे, हा देखील वनदिन साजरा करण्यामागचा उद्देश आहे. बदलत्या हवामानावर भविष्यात तरतूद करताना आणि धोरण निश्चिती करताना जंगलांबाबत योग्य विचार होत असल्याची खात्री या मंचावरुन एकत्रितपणे करता येईल.

दृष्टीआड असलेल्या सृष्टीचे महत्तव मनुष्याला न समजल्याचे हे अगदी उघड उदाहरण म्हणता येईल. हवा, पाणी व इतर गोष्टी आपल्याला मिळतात त्या जंगलामुळेच. परंतू सिमेंटच्या जंगलासाठी  हिरव्या जंगलांचा ऱ्हास केला जातोय. निसर्गाचा समतोल ढासळत असल्याचे ७० च्या दशकात जाणवू लागले.

१९७१ मध्ये युरोपियन कॉनफिरडेशन ऑफ अॅग्रीकल्चरच्या  २३ व्या बैठकीत हा दिन साजरा करण्याची संकल्पना पुढे आली. या दिनानिमित्त वनिकी संदर्भातील उत्पादन, संरक्षण व रंजकता या तीन महत्तवाच्या घटकांबाबच चर्चा केली जाते. वनिकी हे वनव्यवस्थापन,वृक्षलागवड व आणि संबधित नैसर्गिक साधनसंपत्तीचे व्यवस्थापन करणारे शास्त्र आहे. वनाद्वारे पुरविल्या जाणाऱ्या नैसर्गिक सुविधांचा शाश्वत पुरवठा करण्याच्या दृष्टीने वनाचे व्यवस्थापन करणे हे वनकिचा मुख्य उद्देश आहे. वन म्हणजे केवळ झाडे नाहीत तर अनेक सजीव-निर्जीव घटकांनी बनलेली परिसंस्था आहे.

जागतिक वन दिन वसंत ऋतू मध्ये साजरा करण्याचे कारण म्हणजे या कालावधीपासून वनांमध्ये फुलोऱ्याची विविधता असते. संत तुकाराम यांच्या अभंगवाणीनुसार “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे ! पक्षी ही सुस्वरे आळविती ! या वसंत वसंत ऋतूमध्ये झाडांची फुले, पळसाची फुले, पांगाऱ्याची फुले, काटेसावर इत्यादी झाडांची फुले ही मनुष्य प्राण्यांचे व पक्षींचे लक्ष वेधून घेते.

अनावश्यक जंगलतोड टाळणे, अधिक झाड लावणे, जंगलांपासून मिळणारी उत्पादने व त्याचे फायदे तसेच जंगलांना भेट दिल्याने मिळणारी माहीती या मुद्द्यांची लोकांना माहिती व्हावी यासाठी सरकार व अनेक संस्था कार्यक्रम घेत असतात.

Previous Article

उस्ताद बिस्मिल्ला खॉं

Next Article

आज दिवस व रात्र सारखीच !

You may also like