Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

मराठा म्हणजे नक्की कोण?

Author: Share:

आत्तापर्यंत असा समज होता कि मराठा म्हणजे महाराष्ट्रधर्म पाळणारा. बखरींमध्ये महाराष्ट्र धर्म हा हिंदू म्हणजेच वैदिक धर्म पाळणारा असा अर्थ होतो. महाराष्ट्रायाचा अपभ्रंश मर्हाट्टा असा प्राकृतात होऊन त्याचा अपभ्रंश मराठा झाला. महाराष्ट्रातील प्रत्येकालाच मराठा म्हटले जात होते. म्हणजे मराठा हा शब्द जातीवाचक शब्द नसून स्थलवाचक शब्द म्हणून योजला जात असे.

ज्ञानेश्वरीतील एक मूळ पाठही “माजा मर्हाटाचि बोलू कवतिके, परी अमृतातेहि पैजा जिंके.” असा आहे. यांत मर्हाटा शब्द जातीवाचक नाही. तसेच समर्थ रामदास जेव्हा “मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म राखावा” असे म्हणतात तेव्हा त्यांना केवळ एका जातीचे लोक अभिप्रेत नक्कीच नाहीत. लोकमान्य टिळकांनी मराठा वृत्तपत्र काढले ते समस्त महाराष्ट्री जनांसाठी, काही कोण्या एका जाती साठी नव्हे. म्हणजे १९२० पर्यंतही मराठा हा शब्द जातीवाचक नव्हता हे लक्षात येते. एवढेच नव्हे तर परीट जातीचे गाडगे बाबा यांनी पंढरपुरात मराठा धर्मशाळा स्थापन केली याचाही अर्थ असा की मराठा हा शब्द संत गाडगे बाबांनी स्थलवाचक म्हणूनच वापरला, जातीवाचक नव्हे ! आळंदीला एक जूनी मराठा धनगर समाज धर्मशाळा आहे, यावरून धनगर समाजही पूर्वापार स्वतःला मराठा म्हणवतो यावरूनही मराठा हा शब्द जातीवाचक नसून स्थलवाचक आहे हे लक्षात येते.

मराठा हा शब्द ९६ कुळी म्हणजे जातीवंत क्षत्रियांसाठी वापरला जातो हेही सर्वांना माहीतच आहे. म्हणून अस्सल मराठा हा शब्दप्रयोग आजही ९६ कुळी क्षत्रीय करतो. पुण्यातील बाणेर मध्ये अस्सल मराठा नावाचे हॉटेलही आहे. तसेच हलका, अक्करमाशे, कुणबी धनगर, चांभार हे ही स्वतःला मराठा म्हणतात.याचा अर्थ आजही मराठा हा शब्द जाती वाचक नसून स्थलवाचक आहे. शरद पवार, पृथ्विराज चव्हाण, विनायक मेटे व पुरुषोत्तम खेडेकर हे तिघे मराठा, पण नक्की कोण अक्करमाशे नं कोण अस्सल हे कळणे कठीण आहे. कारण मला आजपर्यंत भेटलेले सर्व ९६ कुळी स्वाभिमानाने सांगत आहेत कि पंजाबराव देशमुखांनी आम्हाला पूर्वीच विचारलं होतं की तुम्हाला आरक्षण हवं का तर आम्ही नको म्हटलं होतं.

तसं बघितलं तर आज मराठा मोर्च्यांमध्ये ९६ कुळीं नेत्यांनी किंवा शिवरायांचे वंशज असलेल्या राजेमंडळींनी विशेष व प्रभावी सहभाग घेतलेला दिसत नाही. काँग्रेसमधील बहुतांश मराठा नेता हे ९६ कुळी आहेत, त्यांनीही मराठा आरक्षणासाठी त्यांच्या शासन काळात काही विशेष केलेले नाही.

यावरून मराठा आरक्षणाच्या नावाखाली नक्की कोणाला आरक्षण हवे आहे ही विचारणीय बाब आहे.

लेखक: धनंजयशास्त्री वैद्य

Previous Article

आचार्य विनोबा भावे अर्थात विनायक नरहरी भावे

Next Article

भक्तीतल्या “क” चा फरक

You may also like