पडणाऱ्या मार्केटचे करू तरी काय?

Author: Share:

मागील, आठवड्यामध्ये सेन्सेक्स ३२२९३ वरून ३२५२६ वर घसरला. मागील एका महिन्यात सेन्सेक्स ३४५०० वरून ३२५०० वर घसरला आहे. अगदी मागील सहा महिन्यात सुद्धा सेन्सेक्स ३१६७१ वरून ३२५९६ म्हणजे ११०० पॉईंट वाढला आहे. अर्थात मधल्या काळात तो ३६००० पर्यंत चढून खाली आला आहे, याचा अर्थ सेन्सेक्स जानेवारी ३०, सर्वोच्च ३६२८३ वरून मागील तीन महिन्यात तब्बल ४००० अंशांनी घसरला आहे. आणि काल शुक्रवारीही नक्की सेन्सेक्सचा ताल काय असेल याची कल्पना तज्ज्ञांना नाही. त्यामुळे ह्या पडणाऱ्या मार्केटमध्ये गुंतवणूकदारांनी काय करावे याचा अभ्यास करणे आवश्यक आहे.

सेन्सेक्स जानेवारी मध्ये ३६००० पर्यंत जाऊन आल्याने, पुन्हा बाजार उसळी घेईल याबद्दल लोकांच्या मनात शंका नाही. भारतीय शेअर बाजाराच्या साकारात्मकतेबद्दल कुणाच्याही मनात शंका नाही. प्रश्न आहे तो मार्केट टाइम करणायचा, जे करण्याचा प्रयत्न करणे चुकीचे आहे. याचा अर्थ, आजच्या मार्केट मध्ये हळू हळू आपले पैसे गुंतवत राहणे योग्य आहे. यामध्ये विशेषतः, खूप खाली उपलब्ध असलेले चांगले शेअर्स आणि लो बीटा शेअर्स (ज्यांच्या हालचाली मार्केटच्या हालचालीपेक्षा कमी प्रमाणात होतात) यांच्यावर लक्ष ठेवले पाहिजे.

मागील आठवड्यात सर्वाधिक वाढलेल्या समभागात ज्युबलीअंट फूडवर्क ८% वाढून २२७८ वर पोहोचला आहे. हा समभाग मागील महिन्याभरात २७८ अंशाने म्हणजे १५% वाढला आहे. हा लो बीटा समभाग आहे.  मॅरिको लिमिटेड हा समभाग सुद्धा मागील आठवड्यात ३०० वरून ३२५ पर्यंत वाढला आहे. मागील महिन्याभराचा चार्ट पाहता, ३०० नंतर त्याला उसळी मिळालेली पाहायला मिळते. जेके लक्ष्मी सिमेंट यामध्येही आठवड्यात ७% वाढ दिसली आणि मागील महिन्याभरात ४१८ नंतर त्याच्यात चांगली उसळी पाहायला मिळते आहे. हे सर्व शॉर्ट आणि मिडीयम टर्म चांगले शेअर्स ठरावेत . रॅडिको खैतानचा समभाग मागील ६ महिन्यात २०० वरून ३४५ पर्यंत गेला आहे.हे ५०% रिटर्न्स आहेत. टायटन कंपनीचा समभाग ही मागील महिन्याभरात सातत्याने वाढ दाखवत आहे.  केपीआयटी क्युमिन्स च्या समभागानेही मागील सहा वर्षात खुप चांगली वाढ दाखवली आहे. लहान समभागमध्ये गौतम जेम्स जो ८ फेब्रुवारी ला लिस्ट झाला, ४० रुपयांवरून ७४ वर पोहोचला आहे. मात्र ह्या समभागात गुंतवणूक करताना जपून करावी.

सध्या आयसीआयसीआय सिक्युरिटीज चा आयपीओ खुला आहे, ५१९-५२० हा प्राईस बंद आहे, आणि इश्श्यु २६ मार्च पर्यंत खुला आहे. शेअर मार्केटमधील ग्रोथ पाहता, शेअर ब्रोकर्स च्या समभागांनाही चांगले दिवस येतील. त्यामुळे हा समभाग चांगला वाटत आहे.

Previous Article

२५  मार्च 

Next Article

तुमची माहिती जपून ठेवा: सोशल मीडियावर काय काळजी घ्यावी?

You may also like