हिंदू धर्म म्हणजे नक्की काय? भाग-१

Author: Share:

खुपदा मला इतर धर्मियांकडून असे ऐकण्यात येते, कि तुमचा हिंदू धर्म म्हणजे धर्म कसा काय ? प्रत्येक धर्माचे आपले एक स्थापक आहेत,तसे हिंदू धर्मात नाही. या धर्माची स्थापना कोणी, कधी, कशी आणि का केली, ते माहित नाही. हिंदू धर्मात एवढे देव कसे काय? दोन विरोधी विचारधारा एकत्र कशा काय ? यात असणाऱ्या प्रथा कोणी आणि कशा तयार केल्या ? आर्य भारतीय कि बाहेरचे? अजून बरेच काही….. त्यासाठी मी हा लेख लिहायला घेतला.

हिंदू धर्म म्हणजेच वैदिक धर्म. वैदिकांनी भारतावर आक्रमण केले आणि इथल्या मूळनिवासींना गुलाम बनवले, आपला धर्म त्यांच्यावर लादला अशी एक कलोकल्पित गोष्ट रचून तिचा प्रचार जोरात केला गेला. मक्समुलरने हा सिद्धांत प्रथम मांडला, तो म्हणजे वैदिक ऋचांत जे वर्णन आले आहे, ते वर्णन हे युरेशिया या भागातले आहे, त्यामुळे ब्राह्मण हे विदेशी आहेत. ब्रिटीशांच्या फोडा आणि राज्य करा या वृत्तीला, ते अनुसरूनच होते. पण इथल्या मूर्ख लोकांनीही हा सिद्धांत उचलला.(आता संपूर्ण मानवजातच आफ्रिकेतून जगभर पसरली आहे, हे विज्ञानाने DNAचा आधार घेऊन सप्रमाण सिद्ध केल्याने संपूर्ण जगच परकीय म्हणाल का?).

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेदातील थंड हवामानाचे प्रदेश म्हणजे जर युरेशिया वाटत असेल तर त्या लोकांनी पृथ्वीचा इतिहास थोडासा बघितला तर लक्षात येईल कि पृथ्वीवर कोणत्याही वेळेस सारखेच तापमान कधीच नव्हते. नद्यांचे प्रवाहही बदलले गेले आहेत. अगदी शंभर ते दोनशे वर्षांच्या कालावधीत पर्यावरणात फरक पडतो. जशी पृथ्वी सुर्यामालेभोवती फिरते, तशी सुर्यमालाही आकाशगंगेभोवती फिरते. याचवेळेस जर पृथ्वी अथवा आपली सूर्यमाला कोणत्याही चुंबकीय वादळात आली तर पृथ्वीभोवती शीतयुग येते. असे शीतयुग वारंवार येऊन गेले आहेत. याशिवाय असे खूप साऱ्या नैसर्गिक गोष्टी उदाहरणार्थ भूकंप, पूर, ज्वालामुखीचा उद्रेक , सौरवारे, चुंबकीय वारे या सर्वांचा परिणाम पर्यावरणावर होतच असतो.

राजस्थानात आज आपण वाळवंट बघतो. पण तरीही तिकडे एवढे मोठाले राजवाडे, किल्ले आपणास दिसतात. कोणी वाळवंटात राजवाडा अथवा किल्ला का बांधेल? सामान्य प्रश्न आहे. पण तरीही तिथे ते तेव्हा बांधले आहेत, जेव्हा ती भूमी खऱ्या अर्थाने सुजलाम सुफलाम होती. जुन्या पारंपारिक राजस्थानी गाण्यांमध्ये राजस्थानचे वर्णन ऐका. म्हणजे फक्त चारशे ते पाचशे वर्षांपूर्वी कालखंड कसा असेल ते आपण नाही ओळखू शकत, तर आर्यांचा कालखंड इसवी सन पूर्व ४००० वर्षे आहे. म्हणजे आतापासून सहा हजार वर्षे जुना. मग तरीही याबाबत संशोधन तर दूरच, सामान्य विचारही केला जात नाही.

जुन्या हडप्पा संस्कृतीचे अवशेष सापडले, त्यात काही मानवांचे अवशेष होते. जनुकीयदृष्ट्या त्यात ४ प्रमुख वंशाचे पुरावे सापडले. म्हणजे एखाद्या भागात एकापेक्षा जास्त वंश आधीपासूनच राहू शकतात. मी काही दिवसांपूर्वी टीव्हीवर एक कार्यक्रम बघितला ज्यात जगभरातील विविध भागातील लोक समोर बसले होते. त्यांच्या DNAचे पृथ:करण करून त्या व्यक्तीचे पूर्वज कोणकोणत्या वंशाचे होते, ते फार सुरेख सांगितले होते. त्यामुळे आर्य किंवा कोणीही, हेही विविध प्रकारच्या वंशानेच बनले आहेत. त्यामुळे ते जरी मिश्र वंशाचे असले तरीही भारतीयच होते, याविषयी दुमत नाही. आणि तसेही विज्ञान हे कधीच पूर्ण नसते. त्यामुळे अजूनही माहिती नक्कीच मिळेल.

क्रमशः

लेखक: विवेक बाळकृष्ण वैद्य

असे लेख/बातम्या व इतर साहित्य नियमितपणे वाचण्यासाठी आमच्या Facebook Page ला Like आणि Follow करा: https://www.facebook.com/SmartMaharashtraOnline/a

Previous Article

३ ऑकटोबर 

Next Article

वीर जवान तूझे सलाम, वीर जवान अमर रहे

You may also like