विठ्ठला कुठे आहेस तू

Author: Share:

असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज 

www.facebook.com/SmartMaharashtraOnline


तू आहेस याचा आधार वाटतो
या अधांतरी जगण्याला
तुझ्यावर भार टाकण्या इतपत भरोसा दिला आहेस मला

तुझ्यावर भिस्त ठेवलीय म्हणून
कुणाच्या जाचातापाला नाही भीत
हा ठामपणा कधी कधी नाही टिकत
मनाचे बांध राहतात सुटत तुटत

तू नाहीसच वाटतं कधी कधी जेव्हा या जगात
माजतो गदारोळ
तेव्हा येतो तुझा अतोनात राग
पाहून क्षुद्र चिखलफेक
भंपक गोंधळ

तू नसण्याचा जाणिवेने मी होते अनाथ
अवतीभवती वाळवंट
आणि वाळूचे वादळ
तू नसण्याचा जाणिवेने अडखळतो श्वास
पाहून ताळमेळ नसलेला मानवीय खेळ

तू आहेस याचा असणारा विश्वास
तो आतूनच येतो आपोआप
तरीही हा घोळ तू का करावास
निष्कपटावर तुझा पडतो हात

इतका कसा तू निर्गुण निराकार
अहंकाराला तुझा राहत नाही धाक
निरागसतेला वाटेनासा होतो भरोसा
तुला मारावी वाटत नाही हाक

अंगात वादळ वारा भरून
न्याय अन्यायाची तुला चाड
नसल्यासारखा उत्पात घडवतोस
चंागुलपणावरही तुझी का पडते धाड

मी एक क्षुद्र जीव अथांग विश्वातला
निसर्गनियमांचा अनादर न करताही
अघटीताची वाटते भिती
आणि प्रार्थना उमटतात ऊरापोटी।।।।।।

कविता: सावित्री जगदाळे

Previous Article

बालरंगभूमीच्या जन्मदात्या सुधा करमरकर

Next Article

अंतर्मुखी सदा सुखी!

You may also like