विष्णु गणेश पिंगळे

Author: Share:

विष्णु गणेश पिंगळे क्रांतिकारकांमधील एक अग्रगण्य नाव. लाला हरदयाळ आणि डॉ. खानखोजे यांच्यासोबत ‘गदर पार्टी’ या प्रसिद्ध क्रांतिकारी संघटनेची स्थापना त्यांनी केली. भगतसिंग यांनी यांच्याकडूनच क्रांतिकार्याची प्रेरणा घेतली.

विष्णु पिंगळे यांचा जन्म २ जानेवारी १८८९ रोजी पुणे जिल्ह्यातील तळेगाव (ढमढेरे) येथे झाला. अमेरिकेतून ते इंजिनीयर झाले. पारतंत्र्यातील देशाच्या दुर्दशेने तळमळून क्रांतिकार्याला जीवन समर्पित करण्याचा त्यांनी निश्चय केला. ऑरेगॉन व कॅलिफोर्निया संस्थानातील सैन्य सिद्धतेला त्यांनी स्वत:ला वाहून घेतले. पहिल्या महायुद्धाच्या वेळेस सशस्त्र क्रांती करून देश स्वतंत्र करण्याच्या ध्येयाने पिंगळे भारतात आले. रासबिहारी बोस, विष्णु पिंगळे, कर्तारसिंह सराबा, शचिंद्रनाथ संन्याल आदींनी २१ फेब्रुवारी १९१५ रोजी भारतात सार्वत्रिक सशस्त्र उठावणी करण्याची योजना केली होती. मात्र फितुरीमुळे कट फसला आणि विष्णु पिंगळे सहित ७ क्रांतिकारकांना  लाहोरच्या कारागृहात फाशी दिली गेली. तेंव्हा त्यांचे वय अवघे २६ वर्ष होते.

फासावर गेलेले ८ क्रांतिकारक

विष्णु गणेश पिंगळे

कर्तारसिंह सराबा

सरदार बक्षीससिंह

सरदार जगनसिंह

सरदार सुरायणसिंह

सरदार बुटासिंह

सरदार ईश्वरसिंह

सरदार हरनामसिंह

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी क्रांतीकारकांना प्रेरणा देण्यासाठी लिहिलेल्या ‘तेजस्वी तारे’ या पुस्तकात दहा क्रांतिकारकांची ओळख करून दिली आहॆ त्यांत विष्णु गणेश पिंगळे यांचा समावेश आहे.

Previous Article

महाराष्ट्रातील प्रमुख पाच शहरांमधील फेसबुक वापरकृत्यांमध्ये केवळ ४१% मराठी भाषिक!! व्यंकटेश कल्याणकर यांचे संशोधन

Next Article

१६ नोव्हेंबर

You may also like