विसर्जन

Author: Share:

विसर्जन करावे सत्तेचे

ती सत्ता ज्यात ठाण मांडून बसलेत कावळे मसणवट्यातले,

दृढ निश्चय त्यांचा

एकत्र येऊन फक्त स्तोम माजविण्याचा

डाव मात्र साधतात तेच भल्याभल्यांचा,

एक डाव भुत्याचा पण दुसरा पत्त्यांचा

बळी पडतो येथे जीव भोळ्या भाबड्यांचा,

नावात काय असते म्हणतात

पण नामात श्रीच्या जीवन सारे अर्घ्य तुजला रे,

भक्तगण गाती आरतीला

ओवाळीती राजा गणरायाला,

अर्पूनी सुख-दुःख उदरात ठेवितो पाप-पुण्य

लांब सोंड गोंडस गोजीरी

जास्वंदी सुगंध अबीर गुलाल उधळायला,

ईथे अश्व उधळीतात कर्मरांगडे करंटे

खेळ खेळतात चोरट्यांचा

अन् फड जमवतात जनसामान्यांचा,

का असा अनर्थ होतोय

देवा तुझ्या नादखुळ्या भक्तीचा

अवतारीशी आता तू तारणहार

चिंतामणी तू विघ्नेश्वर

विसर्जन कराया तुझीया आलो

तूच करीसी सत्ताधार्यांचे विसर्जन.

 

कविता – श्री. प्रदीप बडदे

Previous Article

कंटेनर उलटल्याने मुंबई-पुणे महामार्गावरील मुंबईच्या दिशेने जाणरी वाहतूक बंद

Next Article

शेळ्यांची विक्रमी निर्यात

You may also like