Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

मराठी माणसाची उंच भरारी, गिनीज बुकमध्ये नोंद, ३२७ गायकांनी गायले १०९ शब्द.

Author: Share:

मुंबई: “डॉ. तात्या लहाने, अंगार” हा चित्रपट ६ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. जे जे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांच्या जीवनावर आधारित हा मराठी चित्रपट आहे. या चित्रपटाची निर्मिती विराग वानखेडे यांनी केली आहे.

विशेष म्हणजे विराग वानखेडे यांनी नवा विक्रम नोंदवला आहे. ३२७ गायकांना एकत्र घेऊन या चित्रपटाच्या शिर्षक गीताचे समूह गीत गात, हा

जागतिक विक्रम रचला आहे. या विक्रमाची नोंद गिनीज बुकमध्ये झाली आहे. एकाच वेळी सर्वांनी गाणे न गाता गाण्यातील एक एक शब्द प्रत्येकाने गायचा होता. गाण्यामध्ये एकूण १०९ शब्द होते. हे आव्हान सर्व गायकांनी उत्कृष्टपणे निभावले आहे.

तात्याराव लहाने हे सुप्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. २ लाखांवर अधिक नेत्र शस्त्रक्रिया त्यांनी केली अहे. महत्वाचे असे की त्यांच्यामुळे अनेक गरीबांना दृष्टी मिळाली आहे. त्यांचं हे दिव्य कार्य वानखेडे ह्यांनी पडद्यावर रेखाटले आहे.

नवी मुंबईतील या मराठी माणसाने रचलेल्या जागतिक नोंदीमुळे त्याम्चे सर्वत्र कौतुक होत आहे.

Previous Article

आजच्या दिवशी.. त्या वर्षी

Next Article

ओमकार… सुदृढ आयुष्याचा महामंत्र.

You may also like