विकास

Author: Share:

कामा निमित्ताने मी जरा ओफिस मधून जरा लवकरच आलो. घरी आल्या आल्या पटकन तयारी केली. वाहिनीनी चहा बनून ठेवला होता.. तो पटकन पिला, गाडी ला किक मारली अन लगेच cyber cafeत निघालो. ऱस्त्यात जाताना कामाचे विचार चालू होते.. कॅफे बाहेर पोहोचलो… गाडी लावतालावता माझं लक्ष एका मुला कडे गेल.. अन मी shock झालो.

अन पुटपुटलो “विकास” खुप दिवसान्नी एखाद्या आपल्या जिवापेक्षा जवळच्या मित्राला पहाताच सर्वांची जि गत होते तिच माझीही झाली. मी त्याच्या पासुन ५ फुटावर होतो. त्याची नजर माझ्या वर होती पन तो काही हसला वैगरे नाही. मी त्याला हात केला पन त्यानी केलाअ नाही. शेवटचा पर्याय म्हणून मी त्याच्या पुढ्यात उभा राहिलो. अन आवाज दिला तो एकदम इकडे तिकडे पाहु लागला…अन म्हणाला “कोण?”
मी चक्रावलो अन माझ्या पाया खालची जमीन सरकली.. डोळ्यात पाणी आलं….

मित्रांनो जे वास्तव माझ्या समोर आले त्या वास्तवाच्या समोर मला कधीच जायच नव्हतं.
विकास पूर्णपणे blind झाला होता.

ही विकासची कहाणी. हुशार पण खोडकर आणि तितकाच मायाळू. आम्ही १ ली पासुन एकाच शाळेत.. अभ्यासात हुशार.. मी थोडा कच्चा. सर्व शिक्षकांचा तो आवडता विध्यार्थी. शाळेत कोणत्याही कार्यक्रमात तो पुढे असायचा. खेळ असो की सांस्कृतीक कार्यक्रम तो नेहनी पुढे. इतकं सारं असुन त्याला नेहमी दुखी पहायचो. कारण विकास ला जन्मापासून उजव्या डोळ्याचा प्रोब्लेम होता. म्हणजे त्या डोळ्यातुन त्याला २०% दिसायच. पण डावा डोळा त्याचा १००% चांगला होता. १ ते ५ शिक्षण आमचं खुप मजा मस्तीत गेलं.


असे दर्जेदार साहित्य वाचण्यासाठी आमचे पेज LIKE आणि Follow करा: https://www.facebook.com/SmartMaharashtraOnline/


मी गणितात खुप कच्चा होता. म्हणून मला आमचे नागरे सर खुप मारायचे. कितीही समजवले तरी मला गणित समजत नव्हते.. काय करणार.

एकदा सर काही गणित देउन वर्गाच्या काही कामानिमित्त बाहेर गेले.. मला काहीच येत नव्हते मी तोंड वाकडे करुन बसलो होतो.. आता सर येउन मारणार म्हणून मी रडू लागलो. विकास आला अन बोल्ला ” काय रे काय रडतो” मी त्याला सर्व सांगितले…तो बोल्ला “अरे काय रडतो मी तुला सांगतो..”
शाळेत सरांनी मला फक्त पुस्तकात असलेलं गणित शिकवले..पण विकासने मला माझ्या आयुष्याचं गणित शिकवले*
इतक्या छोट्या वायात खुप समजूतदार असनारा माझा जिवलग मित्तर आज आयुष्याच्या कोणत्या उंबरठ्यावर येउन उभा आहे. अन मी त्याची काहीही मदत करु शकलो नाही.

“अरे विकास अरे हे काय झालं? ” भरल्या डोळ्यांनी तो काहीच नाही बोल्ला. मला रडू कोसळले अन मी त्याला मिठी मारली.
काही क्षण असेच गेले. मी माझं कामही विसरलो होतो.
त्याला लहानपणीचे काही क्षण आठवले… क्षणात तो हसू लागला… तो बोलला “आयुष्यात खुप काही गोष्टी राहिल्यात… खुप काही करायच होत.. पण काय करणाऱ्… कदाचीत देवाला माझे डोळे आवडले असणार म्हणुन त्याने ते घेउन टाकले.. पण मी माझे स्वप्न पूर्ण करनार… काय आहे ना, देवाने माझे डोळे घेतलेत माझा विश्वास नाही.
लहानपणी आमच्या घरात लाईट नव्हती.. म्हणून मला अंधारात राहायची सवय आहे….आयुष्यभर…

त्याच एक एक वाक्य माझ्यावर आघात करत होतं. ते वाक्य जरी आघात करत असली तरी माझ्या साठी उमेद होते…

शेवटी त्याला मी बोललो.. “तुला काही मदत लागली तर मला नक्की कळव..”
तो बोलला “ही माझी लढाई आहे… मला माझ्यावर विश्वास आहे… अन ती मी कोणाचीही मदत न घेता मीच जिंकणार”

त्याचा भाऊ आला अणि त्याला घेउन गेला..
मी तिथेच बसुन होतो.
जाताना खुप ताकद देउन गेला तो……..

मला विकासचा आत्मविश्वास पाहुन
कविवर्य सुरेश भटांची एक सुंदर कविता आठवली…

विझलो आज जरी मी,
हा माझा अंत नाही…..
पेटेन उद्या नव्याने,
हे सामर्थ्य नाशवंत नाही…ll
छाटले जरी पंख माझे,
पुन्हा उडेन मी.
अडवू शकेल मला,
अजुन अशी भिंत नाही ..||
माझी झोपडी जाळण्याचे,
केलेत कैक कावे..
जळेल झोपडी अशी,
आग ती ज्वलंत नाही..||
रोखण्यास वाट माझी,
वादळे होती आतूर..
डोळ्यांत जरी गेली धूळ,
थांबण्यास उसंत नाही..||
येतील वादळे, खेटेल तुफान,
तरी वाट चालतो..
अडथळ्यांना भिवून अडखळणे,
माझ्या पावलांना पसंत नाही ….||

लेखक: महेश सुनंदा किशोर बेलदार


असे दर्जेदार साहित्य वाचण्यासाठी आमचे पेज LIKE आणि Follow करा: https://www.facebook.com/SmartMaharashtraOnline/


Previous Article

वरुथीनी एकादशी मोदींचा आत्मक्लेश

Next Article

सेन्सेक्स ३४००० पल्ल्याड, आज १६० अंशांची झेप. 

You may also like