विजयदुर्ग

Author: Share:

असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज 

www.facebook.com/SmartMaharashtraOnline


किल्ल्याचा प्रकार : जलदुर्ग

जिल्हा : सिंधुदुर्ग

मुंबई-गोवा या समुद्रकिनार्‍यावर विजयदुर्ग मुंबई च्या दक्षिणेस सुमारे २२५ कि.मी. अंतरावर आहे आणि गोव्यापासून हे अंतर १५० कि.मी. आहे.विजयदुर्गची खाडी पूर्व-पश्चिम वाहणारी आहे,४० कि.मी लांबीची ही खाडी आहे.विजयदुर्ग बंदराची व्याप्ती सुमारे १० चौ.मैलांची आहे.

स्थलनिर्देश

इतिहास

छत्रपती शिवाजी महाराजांनी इ.स.१६५३ साली विजयदुर्ग विजापूरच्या आदिलशाहीकडून जिंकून घेतला,तेव्हापासून विजयदुर्ग किल्ल्याला विशेष महत्व प्राप्त झाले. स्वत: शिवाजी महाराजांनी निशाण टेकडीवर भगवा ध्वज फडकाविला.महाराजांनी हा किल्ल जिंकून घेतला त्यावेळी त्याची व्याप्ती फारशी नव्हती,पण नंतर मात्र किल्ल्याचे क्षेत्र १४ एकर १५ गुंठे इतके झले.महाराजांना विजयदुर्ग या ठीकाणी आरमार केंद्र स्थापन करावयाचे असल्याने त्यांनी किल्ल्याची व्याप्ती वाढवली.

सुरवातीला विजयदुर्ग घेरिया या नावाने ओळखला जात असे, विजयदुर्ग जवळ असणार्‍या गिर्ये या गावावरून घेरिया हे नाव पडले होते.पण महाराजांनी किल्ल्याची दुरुस्ती केली तेव्हा “विजय संवत्सर” चालू होते, म्हणून त्याचे नाव विजयदुर्ग ठेवण्यात आले.

इ.स. १६६४ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी विजयदुर्ग येथे मराठी आरमाराची स्थापना केली,.पुढे सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या काळात विजयदुर्गला आरमारात महत्वाचे स्थान प्राप्त झाले.१६९८ साली छत्रपती राजाराम महाराजांनी कान्होजी आंग्रे यांना ‘सरखेल’ हा किताब बहाल केला .कान्होजीनी विजयदुर्गाच्या सहाय्याने समुद्रावर असा काही दरारा बसविला की बलाढ्य इंग्रजांच्या आरमारासही कित्येक वेळा पराभूत होवून माघार घ्यावी लागली.विजयदुर्ग किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे इंग्रज्,डच्,पोर्तुगीज यांनी सातत्याने किल्ल्यावर स्वार्‍या केल्या पण त्यांना प्रत्येक वेळी हारच पत्करावी लागली.

गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे :

विजयदुर्ग गावात पायउतार झाल्यावर समोरच आपणास ऐसपैस असा विजयदुर्ग किल्ला दिसतो.गडावर प्रवेश केल्यावर मारुतीचे मंदीर लागते,हे मंदीर शिवाजी महाराजांनी गड जिंकल्यावर बांधून घेतले.या मंदीरासमोरून पुढे गेल्यावर जिबीचा दरवाजा लागतो,या दरवाज्यातून आत गेल्यावर डाव्या हातासच ३० फूट उंचीची तटबंदी दिसते,इथून पुढे गेल्याणंतर गडाचे मुख्य प्रवेशद्वार लागते,भव्य अशा प्रवेशद्वाराच्या आत पहारेकर्‍यांसाठी देवड्या आहेत. दरवाजातून आत गेल्यावर पोलिस चौकी आहे,तिथे दुतर्फा तोफेचे गोळे व्यवस्थित मांडून ठेवले आहेत,इथे डाव्या बाजूस खलबत्खाना आहे.तिथून पायर्‍यांच्या वाटेने आपण ध्वजस्तंभाजवळ येवून पोहोचतो.हा ध्वजस्तंभाचा बुरूज पाहून आल्या वाटेने खाली उतरून समोरची सदर व दारूकोठार पहायचे.या कोठारा शेजारच्या भुयारातून ‘खूबलढा तोफा बारा ‘ या बुरुजावर यायचं या भुयाराच्या बाजूने ततावर जाण्यासाठी पायर्‍या असून या पायर्‍यांच्या मार्गाने तटावर चढायचे,इथून तटावर फेरफटका मारण्यास सुरवात करावी.

विजयदुर्गास २० बुरुज असून प्रत्येक बुरुजावर नावाचा सिमेंटचा बोर्ड लावलेला आहे,पुढे तटावरच उभे असलेले लाईट हाऊस लागते,त्याचे पुढेच तटाच्या खाली चुण्याची घाणी दिसते,या चुण्याच्या घाणीच्या बाजूलच गोड्या पाण्याची विहीर असून तिच्या पासून फक्त २० फूटांवर समुद्र आहे.

विजयदुर्गास तिहेरी तटबंदी असून गडाच्या पश्चिम तटाबाहेर मोठे दगड टाकून लाटांच्या मारापासून तटबंदीचा बचाव करण्याचा प्रयत्न केला आहे.गडाचा तट सुस्थितीत असून त्यावर चढण्यास जागोजागी पायर्‍या असल्यामूळे संपूर्ण गडास व्यवस्थीत तटफेरी मारता येते.
संपूर्ण गड फिरून व्यवस्थीत पाहण्यास ३ तास लागतात.

लेखक : अमीत म्हाडेश्वर


असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज 

www.facebook.com/SmartMaharashtraOnline


 

Previous Article

शाळा

Next Article

शेती विकणे आहे

You may also like