‘विज्ञान अनुभूती’ व ‘इंग्लिश फन फेअर’ प्रदर्शनाचे शानदार उद्घाटन

Author: Share:

नांदगाव (प्रतिनिधी) दिनांक: ०९ जानेवारी, २०१७: नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ,नाशिक संचालित व्ही.जे.हायस्कूलमध्ये संस्थेच्या शतक महोत्सवा निमित्त आयोजित करण्यात आलेल्या वैज्ञानिक उपकरणांचे प्रदर्शन व इंग्लिश फन फेअरचे उद्घाटन शास्रज्ञ मा.प्रकाश बाविस्कर यांच्या हस्ते उत्सहात पार पडले. या प्रसंगी नगराध्यक्ष मा.राजेश कवडे,संकुल प्रमुख शशिकांत आंबेकर,संस्थेचे सहसचिव प्रसाद कुलकर्णी,संस्थेचे फेलोज दादासाहेब रत्नपारखी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. पाहुण्यांचे स्वागत विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.नरेंद्र ठाकरे यांनी केले.पाहुण्यांच्या हस्ते आकाशात शांतीचा संदेश देणारी कबुतरे व तिरंगी रंगाची फुगे सोडण्यात आली. उद्घाटन प्रसंगी विद्यार्थ्यांना व उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्रमुख अतिथी मा.प्रकाश बाविस्कर यांनी पर्यावरणाच्या दिवसेंदिवस होणाऱ्या ऱ्हासा बद्दल चिंता व्यक्त करून विद्यार्थ्यांना भविष्यात उद्भवणाऱ्या गंभीर परिणामांची जाणीव करून दिली.

त्याच बरोबर युवा पिढीने नोकरीच्या मागे न धावता कृषी क्षेत्राकडे जाण्यास प्रोत्साहित केले,त्याच बरोबर कृषीसंशोधनात विज्ञान व तंत्रज्ञानाचा अधिकाधिक उपयोग करण्याचा सल्ला दिला.युवा पिढीने विज्ञानाची कास धरल्यास आपला देश नक्कीच जगात प्रगतदेश म्हणून समोर येईल असा विश्वास व्यक्त केला.जागतिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी मातृभाषेबरोबरच इंग्रजी भाषा देखील शिकणे आवश्यक असल्याचे सांगितले.फन फेअरच्या माध्यमातून इंग्रजी भाषा सोप्या पद्धतीने शिकण्यासाठी तयार केलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समिती अध्यक्ष मा.संजीव धामणे होते आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी संस्थेच्या शतक महोत्सवानिमित राबविलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. अशाप्रकारे राबविलेल्या विज्ञान प्रदर्शनातून भावी शास्रज्ञ घडण्यास नक्कीच मदत होणार असल्याचे नमूद केले.

कार्यक्रमाची सुरवातीला थोर शास्रज्ञ सी.व्ही.रमण यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले.या प्रसंगी शालेय गीतमंचाने विज्ञानगीत सादर केले. संस्थेच्या सी.व्ही.रमण अकादमीच्या प्रमुख सौ.सुषमा भानगावकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.विज्ञान प्रदर्शन व इंग्लिश फन फेअर हा उपक्रम राबविण्यामागची भूमिका विशद केली.व विज्ञानातील विविध विषयांची उकरणे या बद्दल माहिती दिली.उद्घाटन झाल्या नंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी पर्यावरण रक्षण संबधी पथनाट्य सादर केले. कार्यक्रमास शहरातील न्यू इंग्लिश स्कूल,जे.टी.के. इंग्लिश मिडीयम,कमलाबाई कासलीवाल विद्यालय,तसेच ग्रामीण भागातील किसान माध्यमिक विद्यालय,वाखारी व माध्यमिक विद्यालय,सावरगाव या शाळांमधील विद्यार्थी त्याच बरोबर पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्रीमती प्रियंका पाटील व श्रीमती पल्लवी बच्छाव यांनी केले.आभार गुलाब पाटील यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी नांदगाव संकुलातील सर्व मुख्याध्यापक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.

बातमी: प्रा.सुरेश नारायणे

Previous Article

भारतीय अर्थव्यवस्थेचा गोषवारा!

Next Article

अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली!

You may also like