शाकाहार वि. मांसाहार, संस्कृती वि. प्रकृती

Author: Share:

असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज 

www.facebook.com/SmartMaharashtraOnline


शाकाहार का मांसाहार हा संस्कृती विरुध्द प्रकृती असा संघर्ष आहे. त्याचा श्रध्दा वा अंधश्रध्देशी संबंध फारसा जोडता येत नाही.
आपण जगताना अनेक सूक्ष्म जीव मरतातच कि किंवा वनस्पतींची पण हत्या शाकाहार करताना होतेच की असा मांसाहार करणाऱ्यांचा स्वसमर्थनार्थ युक्तीवाद असतो. अशा युक्तीवादात “हेतु” चा विचार केला जात नाही. त्या व्यतिरिक्त मांसाहार असल्याने जगात वनस्पती जन्य अन्नपुरवठा पुरेसा होतो, मंसाहारी लोक शाकाहारी बनले तर अन्नधान्याचा तुटवडा पडेल असाही एक युक्तीवाद केला जातो.

जगताना नकळत मारले जाणारे सूक्ष्म जीव, औषधी कारणांसाठी होणारी प्राणीहत्या आणि जिभेचे चोचले पुरवण्यासाठी केलेल्या हत्या यात एकत्रित पणे कशा पहाता येतील?

अन्न धान्याचा तुटवडा पडेल हाही एक चुकीचा युक्तीवाद आहे, मागणी तसा पुरवठा या न्यायाने अन्न धान्याचे उत्पादन वाढवता येऊ शकते. हा एक हयपोथेटिकल दावा आहे.

शेतीचे द्न्यान नसताना गुहेत वल्कले नेसुन शिकार करणारा मानव व आता सुसंस्कृत झालेला मानव यात आपण काय निवडायचे तो विचार प्रत्येकाने करावा. राज्यघटना हि पण संस्कृतीच आहे अराजक हे स्वाभाविक आहे, मग कशाची निवड करायची? संस्कृतीची का प्रकृतीची? परत पशुत्व स्वीकारायचे का प्राकृतिक आहे म्हणून? कारण माणूस हा स्वभावत: पशुच आहे, संस्कृती त्यास मानवता शिकवते.

वि.का. राजवाडे यांनी भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास या पुस्तकात आदीमाणूस हा लैंगिक बाबतीत पण पशिवत होता व नंतर हळु हळु त्यास नाती समजुन येऊ लागली व विवाहसंस्थेचा उदय होऊन सांस्कृतिक विकास कसा झाला त्याचा इतिहास मांडला आहे. नाव जरी भारतीय विवाहसंस्थेचा असे असले तरी तो अर्थातच सर्वच जगाचा इतिहास आहे.

शाकाहार व मांसाहार हा अर्थातच वैयक्तिक आवडीनिवडीचा प्रश्न आहे, पण अन्य जीवांची हत्या शक्य तेवढी टाळून जर माणसाला जगता येईल तर ते जास्त माणुसकीला धरुन होईल.

कोरड विज्ञान आणि भावना यात भावनिक विचार पण तितकाच महत्वाचा आहे. उपयुक्तता हे तत्व किती ताणायचे याचे तारतम्य हवे. एखाद्या गायीने आयुष्यभर दुध-दुभते दिले असेल, बैलाने सेवा केली असेल आणि आपल्याकडे त्यांना त्यांच्या म्हातारपणी पोसण्याची संपन्नाता असेल तोवर कृतज्ञताभाव दाखवणे हि संस्कइती आहे, नुसता स्वार्थ काय कामाचा? आपण माणूस आहोत का यंत्रमानव?

अईवडील म्हातारे झाले म्हणून वृध्दाश्रमात (त्यांचीच इच्छा असेल तर गोष्ट वेगळी) टाकणे हे म्हातारे झाले म्हणून आयुष्यभर दुधदुभते देणाऱ्या पशुधनाला कसायाला विकणे सारखेच वाटते. बुध्दीवादाचा अतिरेक मला अमान्य आहे. मात्र युध्दकालिन वा दुष्कळ वा अत्यंत आपद्‌कालिन परिस्थितीत स्वत:ला जगवणे हेच माणसाचे कर्तव्य असेल. तेवढे तारतम्य संस्कृती रक्षकांना नसते असे मानण्याचे कारण नाही. अपवादात्मक उदाहरणे म्हणजे सरसकट व्यवहार नाही.

मात्र यात शाकाहारींची संस्कृती श्रेष्ठ व मांसाहारींची कनिष्ठ असा विचार केला तर मात्र संघर्षाला सुरुवात होईल. तात्विक युक्तीवाद ठिक आहेत पण व्यवहारात मात्र व्यक्ती स्वातंत्र्य देणे हेच योग्य आहे.

टिप: मी शाकहारी आहे, पण काही दोन ते तीन प्रसंगी मांसाहाराची चव घेतली होती. खास असा प्रेमात पडलो नाही. नंतर गेली पंचवीस वर्षे तरी मांसाहाराची, हत्येची कल्पनाच नकोशी वाटु लागली आहे.

लेखक: चंद्रशेखर साने


असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज 

www.facebook.com/SmartMaharashtraOnline


 

Previous Article

प्लास्टिक बंदसाठी तरुणाईने साधला नागरिकांशी संवाद…

Next Article

तुम्ही नक्की शेतकरीच ना ?

You may also like