नांदगाव (प्रतिनिधी) – मालेगाव तालुक्यातील निमगुले येथील सुपुत्र सेवा रत भारतीय थल सेनेतील 85 फिल्ड वर्क शॉप इ एम इ बटालियन चे जवान कै. संदीप गंगाधर कदम हे दि. 30 सप्टेंबर रोजी पहाटे परिवाराला भेटायला रजेवर आले, असता त्याच दिवशी सायंकाळी अपघातात कालवश झालें. त्याच्या पाठीमागे वृद्ध वडील, भाऊ, पत्नी आणि दोन चिमुकल्या मुली असा परिवार आहे.
1 ऑक्टोबर रोजी त्याचे पैत्रुक गावी सायंकाळी 5.30 वाजता अत्यंत शोकाकुल वातावरणात व शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आला. प्रसंगी नाशिक येथून देवळाली कॅम्प येथिल सैनिकांनी आपल्या लाडक्या जवानाला शाश्रु नयनांनी मान वंदना आणि अखेरचा निरोप दिला. तालुक्यातील पंचायत समितीच्या सभापती महोदया, तहसीलदार कार्यालय ,माजी सैनिक संघटना मालेगाव,नांदगाव, जिल्हा सैनिक कार्यालय नाशिक तसेच तालुक्यातील असंख्य आजी माजी सैनिक आपल्या लाडक्या जवानाला अखेरचा निरोप देण्यासाठी सकाळ पासून उपस्थित होते.
बातमी: प्रा.सुरेश नारायणे
- Tags: jawan