Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

वेद अपौरुषेय, ईश्वरनिर्मित आहेत का? भाग ८

Author: Share:

37 ‘सृष्टीतील सर्व वस्तू या ‘आत्मन्’चाच आविष्कार आहेत हे गुढ तत्त्व मनाच्या बद्धावस्थेमुळे मला कळले नाही, सत्याचा अनुभव आल्यानंतरच मला ते सत्य समजले.’ – हे विधान ईश्वराचे असेल काय? नाही. कुणा मानवाचेच ते आहे. 39- वेदज्ञानी माणूस सुखी होतो, ते ज्ञान न लाभल्यास जीवन व्यर्थ ठरते. असे ईश्वर म्हणणार नाही, सृष्टि उत्पन्न करतांना म्हणणार नाही. 40 हे धेनु, तूं नित्य चांगले गवत खाऊन सुखी हो, म्हणजे आम्ही सुखी होऊ असे ईश्वर म्हणेल कां? गाय, गवत आणि हे बोलणारा निर्माण झाल्यानंतर कुणी माणसाने केलेले हे विधान वेदात आहे. म्हणजे या तिघांचे नंतर वेद उत्पन्न झालेले आहेत. 44- वायूची गती जाणवते पण त्याचे रूप मात्र दिसत नाही. हे माणसाचे विधान असणार.

ईश्वरास वायूचे रूप दिसत नाही हे कसे शक्य असेल? 49- हे सरस्वती, तू आम्हास स्तनपान करव. अशा प्रार्थना ईश्वराच्या असतील कां? नाहीच. जगातील सर्व वस्तू ‘आत्मन्’चा आविष्कार आहेत म्हणजे वस्तुमात्रात जो ईश्वर भरून आहे, अशा ईश्वराला वेदांचे पुस्तक लिहिण्याचे कारणच काय? तो आतूनच सर्वांना शिकवू शकतो. 50- ‘यज्ञांच्या सहायाने देवगणांनी केलेली पूजा प्राचीन काळी प्रमुख धर्म मानला जाई’ हे विधान कुणा मानवाचेच असले पाहिजे; देवाचे नव्हे आणि जगाच्या आरंभीचे तर नव्हेच नव्हे. 52- ‘जल आणि ओषधि निर्मिणार्‍या, पावसाने जगाला तृप्त करणार्‍या, स्वर्गीय, द्रुत भ्रमणशील, महान् सूर्याला आम्ही आम्ही आमंत्रण करतो.’ हे विधान देव करील कां? नाही. मानव करेल.
अगस्त्य विरचित 26सूक्तांपैकी 21 मध्ये – 165 ते 169, 171, 173 ते 178, 180 ते 186, 189 ते 190 – यात ‘तुम्ही आम्हास अन्न, बल व जयशाली संपत्ती द्या’ असे पालुपद आहे. अशी याचना ईश्वर करेल कां?

ऋ. 1-185-1 द्यावा आणि पृथ्वी या भगिनींमध्ये ज्येष्ठ कोण? त्यांचा जन्म कसा झाला? असे प्रश्न ईश्वराला पडतील कां? नाही. ते प्रश्न मानवाचे आहेत. या सूक्तात ‘तुम्ही आमचे दुःखापासून रक्षण करा’ असे पालुपद आहे. अशा विनवण्या ईश्वर करेल कां? कुणाच्या करेल?
ऋग्वेदाच्या द्वितीय मंडलात गृत्समद नामक ऋषींच्या समुदायाचा उल्लेख अनेकदा येतो; तेव्हा त्यांच्या नंतर वेद झाले हे निश्चित. 2/18 मध्ये दशमान पद्धतीचा निर्देश, 32 मध्ये शिवण कलेचा उल्लेख आणि 29 मध्ये व्यभिचारिणी स्त्रिया गर्भपात करीत आल्याचा उल्लेख आहे. हे ईश्वराने सृष्टीच्या आरंभी वेदात लिहिले असे मानणे म्हणजे वेडेपणाचा कळस ठरेल.

ऋ. 2-17-7 हे इंद्रा, मातापित्यांकडे स्वतःचा हिस्सा अधिकाराने मागणार्‍या उपवर कन्येप्रमाणे मी तुजकडे धनाची मागणी करींत आहे, स्तोत्यांसाठी राखून ठेवलेले तुझे विपुल धन तूं आम्हांस दे. यावरून दिसते की धन, माता, पिता, कन्या इत्यादि सर्व निर्माण झाल्यानंतरचे हे स्तोत्र आहे. ईश्वर रचित नाही.

ऋ. 3-31-1 कन्याविवाहानंतर तिची संतती आपली मानणारा, शास्त्रानुसार वागणारा, ज्ञानी पिता जावयाचा सत्कार करून मुलीच्या पुत्राला स्वतःचा पुत्र म्हणून स्वीकारतो. 2 – मातापित्यांच्या संपत्तीचा अधिकार केवळ पुत्राला मिळतो, कन्येला अलंकार देऊन तिचे लग्न करून देतात, पुत्र आपल्या बहिणीला वांटणी देत नाही, तिला पतीच्या गर्भाधानाचा तेवढा अधिकार राहतो. ही सगळी विधाने समाज पद्धत निर्माण झाल्यानंतरची आहेत, सृष्टीच्या आरंभीची नव्हेत.

भेटूच भाग 9मध्ये…..
अधिक माहितीसाठी डॉ.प.वि.वर्तक लिखित ग्रंथ ‘वैदिक विज्ञान व वेदकालनिर्णय’ अभ्यासावा. या ग्रंथांसाठी संपर्क साधावा विधिज्ञ श्री.पुष्कर वर्तक 9823530501 यांचेशी.
लेखक- डॉ.प.वि.वर्तक
संकलन- गो.रा.सारंग(9833493359)


असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज 

www.facebook.com/SmartMaharashtraOnline


 

Previous Article

जिल्हा परिषद शाळा अजूरफाटा येथे साजरा होणार ऑगस्ट क्रांति पंधरवडा

Next Article

वेद अपौरुषेय, ईश्वरनिर्मित आहेत का? भाग ७

You may also like