शासनाचा महसूल चुकवून मोठ्या प्रमाणात वाळुची तस्करी

Author: Share:

जातेगाव – नांदगांव तालुक्यातील जातेगाव व परीसरामध्ये सारनखेडा दोंडाईचा या भागातुन मोठ्या प्रमाणात अवैध मार्गाने वाळू आणली जात आहे. कुठल्याही खनीज संपत्तीच्या वाहतुकीसाठी किंवा भुगर्भातुन काढण्यासाठी महसुल विभागाची परवानगी पुर्व परवानगी घेऊन त्यासाठी शासनाचा नजराना भरुन ठराविक कालावधीमध्ये भुगर्भातुन काढने किंवा वाहतुक करणे बंधनकारक असते. त्यासाठी ब्रास पध्दतीने शासनास बँकेतुन नजराणा भरणे जरुरी आहे. परंतु सारनखेडा परीसरातुन कमी नजराणा भरुन सोळा टायर असलेल्या ट्रक व ढंपरमध्ये अनुक्रमे आठ व तीन ब्रास वाळुचा नजराणा भरुन आठ ते सोळा ब्रास वाळू शासनाचा नजरानाणा चुकवून आणली जात आहे.

ह्या व्यवसाय करणार्‍यांनी याभागात बोलठान, तांदुळवाडी, जातेगाव, न्यायडोंगरी अदी गावांमध्ये दलालांची टोळी कार्यरत केली असुन सारनखेडा येथुन चोरीने वाळू ऊपसा करुन रात्री व पहाटेच्या सुमारास वाळुची वाहतुक केली जाते. सदर वाळुच्या ट्रक सोबत मोटार सायकरवर काही आंतर ठेऊन मागे व पुढे दलाल असतात. ते वेळ प्रसंगी पोलीस, वनविभाग किंवा महसुल विभागाचे कर्मचारी, अधिकारी किंवा स्थानीक पुढारी व ईतर कोणी भेटले तर चिरीमीरी करुन वेळ मारुन नेतात.

तसे नाही झाले तर दादागीरी करतात. भरधाव वेगाने प्रमाणापेक्षा अधिक लोड भरुन जाणार्‍या ह्या वाहनांमुळे रस्ते खचत चालले असुन पहाटेच्या शुध्द हवेत वृध्द, महीला व तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात बोलठान व नांदगांव रस्त्याने जात असतात. भरधाव वेगाने जाणार्‍या ह्या महसुल बुडवून बेकायदेशिर वाळू वाहतुक करणार्‍या वाहनांवर ह्या वाहनांवर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी महीलांसह नागरीकांनी केली आहे.

बातमी: अरुण हिंगमिरे

असे लेख/बातम्या व इतर साहित्य नियमितपणे वाचण्यासाठी आमच्या Facebook Page ला Like आणि Follow करा: https://www.facebook.com/SmartMaharashtraOnline/

Previous Article

अष्टांग योगाचं वॉशिंग मशीन

Next Article

बोलठान रस्त्याच्या दुरावस्तेमुळे परीसरातील नागरीक व वाहन चालक त्रस्त

You may also like