Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

लासलगाव येथे प्राथमिक शाळेत वह्या पेन वाटप

Author: Share:

नाशिक (उत्तम गिते) जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा व जिल्हा परिषद उर्दु शाळा येथे महेश होळकर मित्र मंडळाच्या वतीने पाट्या व वह्या पेन वाटप करण्यात आले. गरजू विध्यार्थीना वह्या व पेन व शैक्षणिकसाहित्यांची गरज पडते असे समाजिक कामासाठी आमचा मंडल अग्रेसर आहे असे प्रतिपादन अमित गंभीरे यांनी केले.

जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळात पाट्या वाटप करण्यात आल्या तर जिल्हा परिषद उर्दु शाळा येथे वह्या व पेन वाटप करुन अंगणवाडी केंद्र क्र.१५० येथे मुलांना जेवण्याचे डब्बे विध्यार्थींना वाटप करण्यात आल्या. या प्रसंगी महेश होळकर मित्र मंडळ यांच्या पुढाकारने साहित्य वाटून समाजा मध्ये व शैक्षणिक क्षेत्रात उपक्रम राबविण्यात आला.

या प्रसंगी रत्नमाला भावसार, रुपाली गवळी, मुख्याध्यापिका शोभा खैरे, तहसिना तरन्नुम हमिद, सईदा नकवि खलिल, वंदना पिंगटे, महेश होळकर, भैय्या भंडारी, आश्विन शिंदे, संदिप देवरे, केशव शिंदे, राजु होळकर, राहुल गवळी, सुरेश गवळी, दानिस अन्सारी, इम्रान सय्याद, रहेमान मुलानी, रमजान मनियार, दानिश शेख, साहिल शेख, किरान गिते, ललित शिंदे, कृष्णा करपे, अरबाज मुलाणी, राहुल खैरणार, योगेश गंभिरे, अभि केदारे, आदि उपस्थित होते.

Previous Article

अंध व्यक्तींचे व्यवसाय आणि अडचणी

Next Article

नाशिक जवळ लष्कराचे विमान कोसळले

You may also like