Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

उत्तर प्रदेशमध्ये उत्कल एक्स्प्रेसचे सहा डबे रुळावरुन घसरले, २३ ठार ४० प्रवासी जखमी

Author: Share:

उत्तर प्रदेशमध्ये खतौलीजवळ उत्कल एक्स्प्रेसचे सहा डबे रुळावरुन घसरून २३ ठार ४० प्रवासी जखमी झाले असून जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांचे पथक घटनास्थळी रवाना झाले. अपघाताचे  कारण अद्याप समजू शकलेले नाही.

पुरीवरुन हरिद्वारला जाणाऱ्या उत्कल एक्स्प्रेसचे चौदा डबे रुळावरुन घसरल्याचे वृत्त आले होते. सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास हि घटना घडली. मात्र, आता ह्या  घटनेची तीव्रता वाढली असून मृतांचा आकडा २३  आणि जखमींचा आकडा ४० गेल्याचे  लखनौ पोलीस मुख्यालयाने म्हटले आहे. 

संध्याकाळी पावणे सहाच्या सुमारास ही घटना घडली. मेरठ- मुजफ्फरनगर दरम्यान खतौलीजवळ हा अपघात झाला.

पोलीस आणि स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य सुरु आहे.

Previous Article

गोंधळशाही

Next Article

आसाममध्ये पुराचे थैमान : ‘काझीरंगा’ अभयारण्यातील २२५ प्राण्यांचा मृत्यू

You may also like