Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

मराठी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन पुस्तक अभ्यास परीक्षा: पहिले पुष्प: “महाराष्ट्रस्तोत्र: सह्याद्री” 

Author: Share:
मराठी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन घेत आहे 
साहित्यावर आधारित पुस्तक अभ्यास परीक्षा
पहिले पुष्प:
स.आ. जोगळेकर लिखित “महाराष्ट्रस्तोत्र: सह्याद्री”
उत्तमोत्तम मराठी साहित्यावर विश्लेषणात्मक अभ्यास व्हावा ह्या उद्देशाने मराठी इंटरनॅशनल (मिओ) पुस्तक अभ्यास परीक्षा हा उपक्रम सुरु करीत आहे. हे पुस्तक परीक्षण नाही. आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना ज्याप्रमाणे एखादे पुस्तक परीक्षेला लावले जाते तत्सम ही पुस्तकावर आधारित परीक्षा आहे. फक्त ही परीक्षा ओपन बुक पद्धतीतील असेल म्हणजे अभ्यासार्थीला पुस्तक समोर ठेवण्याची परवानगी असेल.
महाराष्ट्रस्तोत्र: सह्याद्री हे पुस्तक महाराष्ट्र सामाजिक आणि राजकीय-भौगोलिक अभ्यासातील अतिशय महत्वाचे पुस्तक मानले जाते. इतिहास संशोधक लेखक सदाशिव आत्माराम जोगळेकर यांनी प्रचंड संशोधनांती हे पुस्तक लिहिले आहे. अनेक अभ्यासक संशोधकांनी आपल्या कामासाठी हे पुस्तक संदर्भ म्हणून वापरले आहे. श्री जोगळेकर यांचे नाव महाराष्ट्रातील इतिहास आणि समाजशास्त्र अभ्यासक विचारवंत सन्मानाने उच्चरतात असे आहे. सह्याद्री सोबत गाथा सप्तशती वरील मराठी अनुवाद आणि विश्लेषण विशेष गाजले आहे. ह्या विषयाचे विश्लेषणात्मक विवेचन व्हावे आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्र धर्माचे जागरण व्हावे ह्यासाठी सह्याद्री : महाराष्ट्र स्तोत्र हे पुस्तक परीक्षेसाठी निवडण्यात आले आहे.
परीक्षा वस्तुनिष्ठ प्रश्न आणि विश्लेषणात्मक अशा दोन स्वरूपात होईल. परीक्षा १०० गुणांची असून ३ तास वेळ असेल. पहिल्या तीन क्रमांकाना मानचिन्ह आणि बक्षीसाने गौरविले जाईल. परीक्षा स्वामी विवेकानंद जयंती अर्थात युवा दिन:  १२ जानेवारी २०१९ रोजी जोगेश्वरी मुंबई येथे होईल.
अधिक माहितीसाठी संपर्क: जयेश मेस्त्री ९९६७७९६२५४
Previous Article

१९ नोव्हेंबर 

Next Article

पुन्हा एकदा ‘जय श्रीराम’- एड. हरिदास उंबरकर

You may also like