यूपीएससी २०१७: उस्मानाबादचा ‘गिरीश बडोले’ देशातून विसावा

Author: Share:

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) २०१७ परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला असून उस्मानाबादमधील गिरीश बडोले देशातून विसावा क्रमांक पटकावून महाराष्ट्रातून पहिला येण्याचा मान मिळवला आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पहिल्या ५०० मध्ये आलेले विद्यार्थी :

गिरीश बडोले (२०), दिग्विजय बोडके (५४), सुयश चव्हाण (५६), भुवनेश पाटील (५९), पियुष साळुंखे (६३), रोहन जोशी (६७), राहुल शिंदे (९५), मयुर काटवटे (९६), वैदेही खरे (९९), वल्लरी गायकवाड (१३१), यतिश विजयराव देशमुख (१५९),रोहन बापूराव घुगे (२४९), श्रीनिवास वेंकटराव पाटील (२७५), प्रतिक पाटील (३६६), विक्रांत सहदेव मोरे (४३०), तेजस नंदलाल पवार (४३६) या परीक्षार्थींचा समावेश आहे.

हैदराबादचा अनुदीप दुरीशेट्टी देशातून पहिला आला आहे.अनू कुमारीने दुसरा क्रमांक आणि तिसरा क्रमांक सचिन गुप्ताने पटकावला आहे.  गुणवत्ता यादीत एकूण ९९० परीक्षार्थींचा समावेश आहे. त्यात ४७६ विद्यार्थी खुल्या प्रवर्गातील, २७५ विद्यार्थी इतर मागासवर्गीय, १६५ विद्यार्थी अनुसूचित जाती आणि ७४ विद्यार्थी अनुसूचित जमातीतील आहेत.

Previous Article

गौतम बुद्ध आणि बौद्ध तत्वज्ञान   

Next Article

तुका म्हणे जाय नरकलोका!

You may also like