Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

शालोम: “अस्त उदय”

Author: Share:

तुम्हाला शालोम ….अन नमस्ते …. गेली तीन वर्षांपासून अस्त उदय एकपात्री नाटकाचे ५५ प्रयोग माधवजी किल्लेदार यांनी यशस्वीरीत्या सादर केले.ज्यू विषयी लिहिलेलं हे महाराष्ट्रातील पहिलाच एकपात्री प्रयोग. त्या नाटकाविषयी थोडं सांगाव असं वाटतय.

गेली २००० वर्ष संघर्ष करीत असलेला ज्यू समाज! हिटलर केलेले ते नरककृत्य आजही डोळ्यांमध्ये पाणी आणण्यासाखेच आहे. त्याकृत्याचे अतीव दुःख माझ्या यहुदी बांधवांना नक्की आजही होतंय. या साऱ्या गोष्टींमुळे म्हणून की काय ते आजही प्रार्थना स्थळांनामध्ये भिंतीच्या समोर रडतात. खरंतर या एकपात्री प्रयोगाचं वर्णन म्हणजे यहुदी अन हिंदू यांच्या मधील बंधु भाव जागृत होतोय. प्रयोगात सांगितल्याप्रमाणे यहुदी अन हिंदू दोघंही भाऊच जरी रक्ताचे नाते नसले तरी सख्ख्या भावप्रमाणे!.

या एकपात्री प्रयोगाची कहाणी अस्तापासून तरउदयापर्यंतची हि कहाणी. हर्झलंने सांगितलेली भविष्य वाणी खरी ठरली अन १९४८ मध्ये ज्यू हे नवीन राष्ट्र उदयास आले. आज हि संघर्षित राहावं लागलेलं हे राष्ट्र ,चहू बाजूंनीं लांडगे लचके तोडत असताना हे राष्ट्र मोठ्या दिमतीनं त्यांना त्या नराधमांना तोंड देत आहे.

ह्या एकपात्री प्रयोगाचे आधी झालेले ५५ प्रयोग अन १६ मार्च २०१८ रोजी झालेल्या ह्या महाराष्ट्रातील ज्यू विषयीच्या एकमेव एकपत्री प्रयोगाचे विशेष महत्व होत.कारण प्रयोग ज्यू विषयी विशेष आपुलकी असलेल्या स्वातंत्र्यवीर सावकर यांनी इंग्रजांच्या विरोधात पुकारलेल्या आंदोनाच्या ठिकाणीच झाला.ज्या ठिकाणी सावरकरांनी कपड्यांची पुणे येथे १९०५ साली होळी केली होती. त्यामुळे प्रयोगाला विशेष महत्व प्राप्त झालं. शिवशाहीर बाबासाहेबांची विशेष उपस्थिती म्हणजे ह्या प्रयोगासाठीचा एक अविस्मरणीय क्षण.एकपात्रीप्रयोगाचे लेखक अन ज्यू विषयी वेगळीच आत्मीयतेने सादर करणारे माधवजी यांना बाबासाहेबांची मिळालेली कौतुकाची थाप.अन संपूर्ण सहयोगी कलाकारांचं केलेलं ते कौतुक विशेष महत्व देऊन जाते.

माधवजी असे कलाकार आहेत ज्या माणसाने फक्त अन फक्त ह्याच प्रयोगासाठी भूमिकेत यावे म्हणून सहा महिने अथक परिश्रम घेतले.एका बंद अंधाऱ्या खोलीत त्यांनी ह्या भूमिकेचा अभ्यास केला. अशा या महान कलाकारासाठी शब्द अपूर्ण पडतील. नाटक लिहितांना केलेला ज्यू लोकांविषयी त्यांचा अभ्यास, अन जे काही प्रेक्षकांना ह्या प्रयोगानिमित्य नवनवीन माहिती मिळाली त्यामागे खूप मोठा माधवजींचा गाढा अभ्यास. ह्या साऱ्या गोष्टी बाबासाहबांनी ओळखल्या अन कौतुकाची ती थाप. खरंच अविस्मरणीयच.अविस्मर्णीयच ……..तुम्हाला शालोम!!

वीरेंद्र सोनावणे

८८८८२४४८८३

Previous Article

लोकहितवादी यांची शतपत्रे

Next Article

सई परांजपे

You may also like