तुम्ही नक्की शेतकरीच ना ?

Author: Share:

असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज 

www.facebook.com/SmartMaharashtraOnline


गेली दोन तीन दिवसांपासून शेतकरी संप चालू आहे.आंदोलन कस होतंय आंदोलन नक्की का होतंय अन येवडा सरकार वर असणारा शेतकऱ्यांचा राग, या साऱ्या गोष्टी नक्कीच बघणं गरजेचं आहे.सरकारच्या काही चुका होतात मान्य आहे. राधामोहन म्हटले त्याप्रमाणे शेतकरी प्रसार माध्यमात येण्यासाठीच आंदोलन करत आहेत का? सरकार नक्कीच ह्या गोष्टींवर संवेदनशील आहे का? आंदोलन नक्की शेतकरीच करताय का?

शेतकऱ्याला पूर्ण एक वर्ष घाम गाळून खूप कष्ट घेऊन शेतात काम करत असतो. पिकांची आपल्या पोटाच्या मुलं प्रमाणे काळजी करत असतो.सुरुवातीला खूपच भांडवल टाकून शेतकरी पीक घेत असतो.आम्ही शेतकरी आहोत.शेतात नक्की किती पिकत फायदा होतो तोटा होता. ह्या साऱ्या गोष्टींचं उत्तर नक्की सांगता येऊ शकता.शेतात आम्ही कायम कापूस पिकवतो.एकरी १० ते १२ क्विंटल कापूस पिकवतो दर वर्षी आम्हाला शेती परवडते तर बाकी शेतकऱ्यांना नक्की पिकाल पाहिजे. त्यासाठी महीनत नक्कीच गरजेचे असते.

ह्या वर्षी कापसाला ५००० क्विंटलला भाव असताना हि आम्हाला शेती परवडत असेल तर इतर शेतकऱ्यांना का नाही परवडत? हि अशी परिस्थिती फक्त आमचीच नसून बरेच शेतकरी शेतात खूपच कष्ट करून चांगले पीक आणतात. कर्ज जरी काढले तरी ते फेडण्याची हिम्मत शेतकरीत असतेच असते. यापरिस्थितीत शेतकरी आपला माल जमिनीवर टाकेल असे शेतकरी करणे शक्यच नाही.आंदोलनासाठी पैसे कुठून येतोय. नक्की शेतकरीच आंदोलन करत आहेत का? ह्या साऱ्या प्रश्नांची उत्तरे आपणच शिधली पाहिजेत.

शासनाकडून खूपच योजना येत आहेत. सोसायटी च कर्ज,बँकांकडून मिळणार पीक कर्ज, पीक विमा, बोण्ड अळीचा पैसा, अशा पाद्धतीच मदत काँग्रेस सरकार कडून हि मिळत होती अन आताही मिळत आहे. पण सध्याच्या सरकारने तरीही शेतकऱ्यांकडे अजून विशेष लक्ष देऊन शेतकऱ्यांना न्याय द्यायला हवा. शेतकऱ्याला शेती मालाला भाव मिळायला हवाच.भाजप सरकारने जल युक्त शिवार खूपच महत्वाचा निर्णय घेतालाय.

पाणी हे शेतासाठी खूपच महत्वाच आहे. शेतकऱ्याला पाण्याच्या नियोजनाबाबत प्रशिक्षण दिले पाहिजे.ठिबक सिंचन याविषयी शेतकऱ्याला पूर्ण मार्गदर्शन मिळायला हवे.कृषी विद्यापीठांनी शेतकऱ्याचे उत्पादन कस वाढेल संशोधन झालेच पाहिजे.कृषी विद्यापीठातील प्रत्यक्ष विध्यार्थी त्याच एकच कर्तव्य असल पाहिजे मी ज्या गावी जाईल त्या गावातल्या शेतकऱ्याला कसा आपल्यापासून फायदा होईल हेच बघितला पाहिजे.

शासनाने प्रत्येक खेड्यात १० शेतकऱ्यांमागे १ कृषी पदवी धारक असला पाहिजे. म्हणजे भारतातील सर्वच शेतकरी शास्त्रशुद्ध पदतीने शेती करू शकतील. ढोबळ अंदाज बंधने शेतकऱ्याचे कमी होऊन योग्य तो अंदाज बांधून योग्य ते मार्गदर्शन घेऊन शेतीत पीक चांगले येईल.
सध्याच्या आंदोलन विषयी बोलायचं झाल तर हे आंदोलन फक्त विरोधी पक्षांनी केलल आंदोलन दिसत आहे.

शेतकर्यांनमध्ये खोटे आरोप शेतकऱ्यांची दिशाभूल होत आहे.रस्त्यावर शेती माल शेतकरी टाकूच शकत नाही.विरोधकांना नक्कीच माहित आहे कि शेतकऱ्यांच्या बाजून राहील त्यावर राजकारण केला तर नक्कीच पुढील निवडणुकीत मुद्दाच होईल.पण शेतकऱ्यांनी शेतात कष्ट करून सद्विवेक बुद्धीने विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा.शेतीमालाची नासधूस करणारे नक्कीच शेतकरी नाही. त्यांना आंदोलनसाठी कुठून पैसे मिळतो का हेही बघणे गरजेचे आहे.

लेखक: विरेंद्र सोनावणे


असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज 

www.facebook.com/SmartMaharashtraOnline


 

Previous Article

शाकाहार वि. मांसाहार, संस्कृती वि. प्रकृती

Next Article

इफ्तार प्रीतिभोज : काही विचार – अरविंद विठ्ठल कुळकर्णी

You may also like