कालच भेटला मला,
माझा एक भाई,
रागाच्या भरात,
तीनदा तलाक़ तलाक़ तलाक़ म्हणून,
बायकोला घटस्फोट दिलेला….
सलाम, नंतर विचारलं मला,
तुझ्या लग्नाचं काय झालं? म्हणून.
मी म्हटलो,
माझं लग्न तर केव्हाचंच झालंय…
हे ऐकताच आश्चर्यचकित होवून,
प्रश्नांची बरसातच केली माझ्यावर.
कस? कधी? कुठे? कुणाशी?
मी सहजपणे हसत म्हणालो,
लग्नाला काय लागतं?
अगदी सोपं आहे.
मला कोणी मुलगी दिसली का,
मी तिला उद्देशून,
अगदी प्रेमाने,
मी तीनदा म्हणत असतो,
निकाह निकाह निकाह,
आणि माझं लग्न होवून जातं.
हे ऐकून जोरात हसला,
आणि हळूच म्हटला,
मूर्खा,
तू काय वेडा झालास का?,
असा तीनदा,
निकाह निकाह निकाह
महटल्याने कुठे कोणाचं लग्न होते का?
मी विचारलं,
आज्ञानतेचा भाव,
चेहऱ्यावर आणत,
मग लग्नासाठी काय लागते?.
एका दार्शनिका प्रमाणे,
मला समझावून सांगत तो म्हणाला,
लग्नासाठी मुलीचा होकार,
मूलगा मुलींकडून दोन दोन साक्ष,
आणि सर्वात जास्त महत्वाचे म्हणजे,
मौलवीची कार्यवाही लागते…..
त्याच्या शहाणापणावर,
गंभीर होत मी म्हणालो,
जेव्हा तुझा घटस्फोट रागात,
तीनदा तलाक़ तलाक़ तलाक़ म्हटल्याने होत असेल,
तर मग माझं लग्न,
प्रेमाने तीनदा,
निकाह निकाह निकाह
म्हटल्याने का होवू शकत नाही बर????
मग कोणाचं लग्न तीनदा,
निकाह निकाह निकाह,
म्हटल्याने होत नसेल तर,
मग कोणाचा घटस्फोट,
तीनदा तलाक़ तलाक़ तलाक़,
म्हटल्याने कसा काय होवू शकेल बर?…..
कविता: डॉ. मो. शकील जाफरी (मंचर) पुणे,
मो. 098679 29589
email : shakiljafari@gmail. com
- Tags: law, muslim, Triple talak