Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

मुस्लिम कट्टरतेला सुप्रिम कोर्टाचा तलाक

Author: Share:

नवी दिल्ली: तिहेरी तलाकवर सुप्रिय कोर्ट काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. यावरुन आता नकाब उठला आहे. सुप्रिम कोर्टाने सहा महिन्यात कायदा करण्याचा आदेश संसदेला दिला आहे. कायदा होईपर्यंत तिहेरी तलाकला बंदी घालण्यात आली आहे.

सरन्यायाधीश जे एस खेहर यांच्यासह पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने अंतिम निर्णय दिला. तिहेरी तलाकमुळे घटनेच्या कलम १४,१५,२१ आणि २५ चं उल्लंघन होत नाही, असं खेहर म्हणाले. तिहेरी तलाक प्रकरणी संसदेने लक्ष घालावं. संसदेने सहा महिन्यात कायदा करावा. त्यासाठी आम्ही तिहेरी तलाकवर सहा महिने स्थगिती घालत आहोत. जर या सहा महिन्यात कोणीही तोंडी तलाक दिला तर तो अवैध असेल” असे म्हणत त्यांनी हा ऐतिहासिक निर्णय सुनावला.

Previous Article

तीन तलाक; मूलभूत संविधानाने दिलेल्या अधिकाराचा विजय – अमित शहा

Next Article

गणपती…

You may also like