शहीद भगतसिंग, सुखदेव व राजगुरु यांची आज पुण्यतिथी

Author: Share:

देशाला स्वातंत्र्य देण्यासाठी फासावर गेलेल्या शहीद भगतसिंग, सुखदेव राजगुरु यांची आज पुण्यतिथी आहे. २३ मार्च १९३१ ला शहीद भगतसिंग, सुखदेव व राजगुरु या तिघांनाही लाहोर कारागृहात फाशी देण्यात आली होती. आजचा दिवस शहिद दिन म्हणूनही ओळखला जातो.

भगतसिंग

भगतसिंग यांचा जन्म २८ सप्टेंबर १९०७ साली बंगा येथे झाला. भगतसिंग यांच्या जन्माच्या वेळी सरदार किशनसिंग व सरदार अजितसिंह यांची कारागृहातून मुक्तता झाली. हा या मुलाचा पायगुण आहे, असे माणून त्याच्या आजीने भगतसिंग असे नामकरण केले. जालियनवाला बाग हत्याकांडाचे परिणाम भगतसिंग यांच्या मनावर खोलवर झाले होते. प्रसिद्ध क्रांतिकारक हे महाविद्यालयात भगतसिंग यांचे सिनियर होते. तर सुखदेव हे त्यांचे वर्गमित्र होते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा प्रसिद्ध ग्रंथ “दि इंडियन वॉर ऑफ इंडिपेन्डेमन्स-१८५७” भगतसिंग यांना तोंडपाठ होता. घरच्यांनी लग्न ठरवल्यावर त्यांनी घरत्याग केला. देशसेवेचे व्रत घेतल्याने मी लग्न करु शकत नाही, असे त्यांनी वडिलांना कळवून माफी मागितली. कानपूरला आल्यावर “बलवंतसिंग” या नावाने अनेक लेख त्यांनी लिहीले. अनेक धाडसी कार्यात त्यांचा सहभाग असायचा.

लाला लजपत राय यांचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला. त्यांना मारणाऱ्या पथकाचा वचपा घेत असताना सॉँडर्स तावडीत सापडल्याने त्याला उडविण्यात आले. या प्रकरणात सर्व फरारी झाले. क्रांतीकारकांचे म्हणणे काय आहे हे जाहीररीत्या सर्वांना समजवण्यासाठी त्यांनी एक योजना आखली. “पब्लिक सेफ्टी” विधेयकाविरुदध देशभर संताप व्यक्त केला जात होता.

या विधेयकावर सेंट्रल असेंबलीत चर्चा सुरु असताना बटुकेश्वर दत्त व भगतसिंग यांनी विधानसभेत बाँब फेकून गोंधळ उडवून दिला. स्वत:हून अटक करुन घेतली. न्यायालयात आपली बाजू मांडली. न्यायालयाने भगतसिंग, सुखदेव व राजगुरु यांना फाशीची शिक्षा सुनावली. २३ मार्च १९३१ साली “इन्कलाब झिंदाबाद” च्या घोषणा देत ते हस्तमुखाने सुळावर चढले.

सुखदेव

सुखदेव थापर यांचा जन्म १५ मार्च १९०७ साली लायपूरमध्ये येथे झाला. भगतसिंग यांनी विधानसभेत बाँब टाकल्यानंतर सुरु झालेल्या छापासत्रात लाहोर मध्ये छापे टाकण्यात आले. तेव्हा काश्मिर बिल्डींगमध्ये पडलेल्या छाप्यात काही बाँब जप्त करण्यात आले. ते बाँब सुखदेव यांनी तयार केले होते. यामुळे त्यांना अटक करण्यात आली. लाहोर कटाच्या पहिल्या खटल्यात १६ आरोपींचा नेता म्हणून सुखदेव यांची नोंद करण्यात आली. नवे सदस्य जमा करुन त्यांचा क्रांतीदलात समावेश करुन त्यांना कुवतीप्रमाणे काम देण्यात सुखदेव निष्णात होते. लाहोर केसमध्ये त्याना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली.

राजगुरु 

शिवराम हरि राजगुरु यांचा जन्म २४ ऑगस्ट १९०८ साली पुणे जिल्ह्यातील खेड (आताचे राजगुरुनगर) येथे झाला. जालियनवाला बाग हत्याकांडाचे पडसाद त्यांच्या मनावर उमटले होते. अनेक पराक्रम करुन त्यांनी क्रांतिकारकांच्या मनात मानाचे स्थान मिळवले होते. लाला लजपतरायांच्या हत्येता सूड म्हणून त्यांनी साधलेल्या अचूक नेमबाजीमूळे साँडर्स वध घडवून आणलेला होता. पुढे फरारी असताना त्यांना फितुरीमुळे अटक झाली. लाहोर मध्ये झालेल्या खटल्यात त्यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली.

संदर्भ – इंटरनेट

Previous Article

घालमेल             

Next Article

रामलीला मैदानावर आजपासून अण्णांचं आंदोलन

You may also like