संशोधनात्मक प्रबंध स्पर्धा

Author: Share:

मराठी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ह्या मराठी माणूस, भाषा, संस्कृती आणि कला ह्यांच्या विकासासाठी प्रयत्नशील असणाऱ्या सामाजिक संस्थेने एका संशोधनात्मक प्रबंध स्पर्धेचे आयोजन केले आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि स्वा सावरकर यांच्याविषयी संशोधनात्मक पैलू पुढे यावेत या विचारातून ह्या एका प्रबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

स्वा सावरकरांचे पूर्वास्पृश्यता निवारणाचे कार्य आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे अर्थशास्त्रीय विचार यापैकी एक विषय निवडून त्यावर मराठीतून किमान १०००० शब्दांचा संशोधनात्मक प्रबंध सादर करावयाचा आहे. यासाठी वयाची किंवा शिक्षणाची कुठलीही अट नाही.

प्रत्येक विषयातील एका सर्वोत्कृष्ट प्रबंधास रु ५,०००/- शिष्यवृत्ती दिली जाईल. प्रवेश शुल्क रु ५००/- असून, ३० एप्रिल पर्यंत शुल्कासहित नाव नोंदणी करणे अनिवार्य राहील. प्रबंध ३० जून २०१८ पर्यंत सादर करावा. अधिक माहिती आणि नावनोंदणीसाठी जयेश मेस्त्री ह्यांच्याशी ९९६७७९६२५४ ह्या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात संस्थेतर्फे आले आहे.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ऑनलाईन फॉर्म येथे भरता येईल. प्रवेश शुल्क कॅश, चेक किंवा ऑनलाईन भरता येईल. 
Previous Article

महिलांचे कायदे

Next Article

‘मन हे ध्यान रंगी रंगले…’

You may also like