Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

ग्रामीण भागातील तरुणाईने केले महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व

Author: Share:

युवा दिनाचे औचित्य साधून खेळ मंत्रालय व नेहरु युवा केंद्राच्या माध्यमातून उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नोएडा येथे नुकताच “नॅशनल युथ फेस्टिव्हल   पार पडला. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील तरुणाईने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले.

उत्तरप्रदेशमधील नोएडा येथे पार पडलेल्या नॅशनल युथ फेस्टिव्हलमध्ये भारतभरातील ६५०० तरुणाईने सहभाग नोंदवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या तरुणांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. तरुण हा देशाचा कणा असून त्यांच्या खांद्यावर या देशाची मदार आहे. असं यावेळी त्यांनी सांगितलं. तर उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रत्यक्ष कार्यक्रमाला हजेरी लावून  तरुणांना मार्गदर्शन केले. केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने देशभरात खेळाडूंना पोषक वातावरण निर्माण करु असं सांगितलं शिवाय प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक युवा संसदेचे आयोजन करुन तरुणांची मते जाणून घेऊ असं सांगितलं.

या फेस्टिव्हलमध्ये देशभरातील अनेक नामांकित वक्त्यांनी तरुणांशी संवाद साधला. शिवाय वायुसेना, नौसेना व लष्कराच्या अधिकाऱ्यांनी, जवानांनी तरुणांना संबोधित करुन संरक्षण दलातील संधी अन् आव्हान याची माहिती दिली.

नेहरु युवा केंद्र ठाणे जिल्ह्याच्या जिल्हासमन्वयक कुसुम ससाणे व सिद्धार्थ चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील वैशाली घावट, जय लाड, ज्योती शिर्के, दिक्षिता विचारे, आनंद खरे, पुजा सुरुम, राहुल हरिभाऊ, दत्तात्रेय पाटील राहुल जाधव, रघुनाथ बंदे यांनी सहभाग घेऊन महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविले. शिवाय युवा संसदेमध्ये सहभाग घेऊन ग्रामीण भागातील शिक्षण, रोजगार आदी मुद्द्यांवर आपली बाजू मांडली. शिवाय उत्तरप्रदेश, दिल्ली, जयपूर येथील प्रेक्षणीय स्थळांना भेटी देऊन त्यांचा इतिहास समजून घेतला.

ग्रेटर नोएडा येथील गौतम बुद्ध विश्वविद्यालयात पार पडलेल्या या फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाल्यामुळे या तरुणांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहेत.

Previous Article

२३ जानेवारी 

Next Article

१ टक्का अब्जाधीश  भारतीयांकडे देशाचे ७३% उत्पन्न:  ऑक्सफॅमचा आर्थिक विषमता दाखवणारा डोळ्यात अंजन घालणारा रिपोर्ट 

You may also like