मुंबईचा राष्ट्रीय तेजोमय समाजरत्न पुरस्काराने निलेश राणे यांचा गौरव

Author: Share:

नाशिक- ९ सप्टेंबर रोजी मुंबई येथे राष्ट्रीय पुरस्कार सोहळा-२०१८ संपन्न झाला त्यात काही राज्यातील प्रत्येक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करत असलेल्या पुरस्कारार्थींची निवड करण्यात आली.

यामध्ये नाशिकचे भूमिपुत्र व नुकतेच दिल्ली येथे राष्ट्रीय युवा प्रेरणास्त्रोत म्हणून घोषित करण्यात आलेले निलेश मधुकरराव राणे यांची निवड राष्ट्रीय तेजोमय समाजरत्न या पुरस्कारासाठी झाली, राणे यांनी आजवर अनेक खेळाडू घडविण्यास जे क्रीडा क्षेत्रासाठी समाजकार्य चालू ठेवले आहे त्यामुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना उत्तम दिशा मिळाली आहे, त्यांच्यासाठी अचूक मार्गदर्शन व सेमिनार घेणे जेणे करून मुलांना समज येणे गरजेचे की उत्तम खेळाडू कसा असावा व  खेळाडूवृत्ती कशी असावी असे कार्य गावोगावी जाऊन ते खेळाडू निमार्ण करणे व क्रिडाक्षेत्राचा देशातील काही राज्यात प्रचार व प्रसार करत आहे, तसेच प्रत्येक घरामध्ये एक तरी खेळाडू असावा की जेणे करून आपल्या राज्याचे व देशाचे नावलौकीक करेल, हा एक क्रीडा क्षेत्रासाठी उत्तम संदेश देण्याचे काम ते करत आहे

 हे उत्तम कार्य बघून त्यांची निवड समितीने या राष्ट्रीय तेजोमय पुरस्कारासाठी निवड केली आहे, श्री.राणे यांना पुरस्काराने सन्मानित करतांना बिग बॉस मालिकेची विजेती व सिनेअभिनेत्री मेघा धाडे, महाराष्ट्र शासनाचे सांस्कृतिक खात्याचे सचिव श्री.संजीव पाळंदे, राष्ट्रीय कीर्तनकार सौ.वीणा खाडीलकर, राष्ट्रीय जेष्ठ समाजसेवक श्री.जे.बशीर सोबत इतर मान्यवर उपस्थित होते.

Previous Article

अंबर्जे गावासाठी दीड कोटींची पाणी योजना मंजूर

Next Article

मंत्रपुष्पांजली अर्थात राष्ट्रप्रार्थना:

You may also like