नांदगाव-न्यु.इंग्लिश स्कुल येथे शिक्षकदिन संपन्न

Author: Share:

नांदगाव (प्रतिनिधी) – येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या न्यू. इंग्लिश स्कूल विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वपली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक डी. व्ही. गोटे, पर्यवे क्षक डी. बी. काळे यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यानी शिक्षक म्हणुन काम पाहिले. मुख्यद्यापक म्हणून यशस्वी जाधव, उपमुख्यद्यापक म्हणून वसुंधरा पवार, पर्यवेक्षक म्हणून पंखुरी फणसे या विद्यार्थिनीनी काम केले.

शिक्षक विध्यार्थीनिनी रंगीत साड्या परिधान केल्या होत्या. या वेळी डी. एम. भिलोरे, विद्यार्थी पंतप्रधान प्रशांत बोरसे, यशस्वी जाधव, वसुंधरा पवार, पंखुरी फणसे यांनी मनोगत व्यक्त केले. मुख्याद्यापक डी व्ही. गोटे यांनी विद्यार्थी शिक्षकांचे अभिनंदन केले. सूत्रसंचालन दिप्ती बोराडे, वैष्णवी जाधव, निकिता मोरे यांनी  केले. चैताली मार्कंड, राणी खरारे, मोनाली नरोटे, मोनाली चकोर, सरस्वती केकाण, कावेरी आहेर यांनी संयोजन केले. प्राजक्ता सुपेकर हिने आभार मानले.

फोटो ओळी नांदगाव येथील न्यू. इंग्लिश स्कूल विद्यालयात शिक्षकदिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी मुख्याद्यापक डी.व्ही. गोटे, पर्यवेक्षक डी. बी. काळे, विद्यार्थिनी मुख्याद्यापिका यशस्वी जाधव, उपमुख्याद्यापिका वसुंधरा पवार, पर्यवेक्षिका पंखुरी फणसे, शालेय पंतप्रधान प्रशांत बोरसे आदी उपस्थित होते.

बातमी: प्रा.सुरेश नारायणे

Previous Article

प्रा.सुरेश नारायणे यांना गोदारत्न पुरस्कार जाहीर

Next Article

७ सप्टेंबर

You may also like