Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

विविध विषयातील पदव्युत्तर शिक्षण तुमच्या कॉप्म्युटर-स्मार्ट फोनवर

Author: Share:

नेहमीच शिक्षणतज्ज्ञ हा विचार बोलून दाखवतात की एखाद्याला आर्ट्स मधील इकॉनॉमिक्स, सायन्स मधील केमिस्ट्री, इंजिनिअरिंग मधील सिव्हिल आणि भूगोल एकत्र शिकायचा असेल बंधने का असावीत. पूर्वी गणित, तत्वज्ञान अर्थशास्त्र एकत्र शिकणारे विद्यार्थी होते आणि शिकवणारी विद्यापीठेही होतीच. आधुनिक काळात हि पद्धती नष्ट झाली आणि १०वी नंतर तुम्ही काय निवडताय त्यातच अभ्यास करणे बंधनकारक झाले.

इ पाठशाळा ने याला छेद देण्याचा एक दखलपात्र प्रयत्न केला आहे. यामध्ये तुम्हाला विविध विषयांचा अभ्यास करण्यासाठी व्हिडीओ उपलब्ध आहेत. हे व्हिडीओ सुद्धा देशभरातील अनेक विद्यापीठांच्या प्राध्यापकांनी तयार केले आहेत. तुमची शिकण्याची उर्मी कायम असेल तर इ पाठशाळा तुमच्यासाठी भांडार आहे. आत्तापर्यंत १५६५७ कोर्सेस अपलोड करण्यात आले आहेत

अजून शासन कन्टेन्ट मागवते आहेच. त्यामुळे येत्या काळात हे अधिक चांगले डेव्हलप होईल.

Website: www.epgp.inflibnet.ac.in

स्व्ययम

दुसरा एक उपरकं म्हणजे स्वयम.  कन्टेन्ट नाही तर सर्टिफिकेशन सुद्धा घेता येते. ऑनलाईन कोर्सेस या आत्तापर्यंत भारतात विकसित न झालेल्या क्षेत्रात हे खूप मोठे पाऊल मानले पाहिजे. अर्थात अजून हे सुद्धा प्राथमिक अवस्थेत आहे.

वास्तविक स्वयं आणि इ पाठशाळा ह्या दोन वेबसाईट एकत्र करून अजून मोठा उपक्रम त्यांना करता येईल.

Website: www.swayam.gov.in

या, रजिस्टर व्हा आणि लुटा आनंद अपरिमित शिक्षणाचा! 

Previous Article

पुस्तक परिचय; आसमंत

Next Article

“Nations by themselves are made…!”- A.O.Hume

You may also like