स्वगत

Author: Share:

काही मिळवायचं असेल तर स्वतः पाशी असावा लागतो आत्मविश्वास, सचोटी, चिकाटी आणि बरंच काही. स्वतःपासून हरलो तर या जगात आपण कधीच जिंकू शकेल का? हे असे प्रश्न नक्कीच मनात येत असतात. मग शुद्ध भावनेने शोध घेतला जातो ‘स्व’चा. आणि स्व चा शोध घेत येणं ही एक कसोटीच आहे. कसा घ्यायचा असतो स्व चा शोध?

काहीच माहिती नसतं तेव्हा रिकामे असण्याची भावना निर्माण होत असते. मग रिकामे रिकामे म्हणत आपण स्व केंद्रित होत जातो आणि त्यात कुठं तरी हरल्याची भावना आली की आपण वाईट विचार करत असतो.मग स्व केंद्राकडे जाणार आपला मार्ग भरकटत जातो.

आम्ही चुकीचा मार्ग स्वीकारतो आणि होत्याचं न्हवत होतं. दिल्ली मध्ये एक विद्यार्थ्याने आत्महत्या केली कारण तो यु पी एस सी च्या परीक्षेला केंद्रावर उशिरा पोहोचला. आता हा निर्णय त्याने जबाबदारी आणि काळजी यातून घेतला असेल ही. परंतु मार्ग चुकीचा होता. एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टीकोन जो पर्यंत आपण बदलत नाही तो पर्यंत आपणास त्या गोष्टींची खोली समजत नाही ना ती गोष्ट.

म्हणून स्वतः कडून स्वतःला हरवायचं नाही. आम्ही ध्येयाच्या मागे लागतो कधी भरकटले जातो आणि त्या मार्गावरून कधी बाहेर पडतो हे कळत नाही. हरणं ही एक वर्तमानातील गोष्ट झाली आपण त्यातून बाहेर नक्कीच पडू शकतो.

काही प्रमाणातील न्यूनगंड आपल्याला मागे खेचत आनू शकतो. पण आपली ध्येय आणि आपले आदर्श जर पक्के असतील तर या अशा अवस्था लवकरचं निघू शकतील. आपण फक्त हरायचं नाही. स्व केंदित स्वभाव आणि स्व केंद्रित ध्येय याचा सामना करताना खूप बदल करावे लागतात. मग जगण्यात बदल असतात, स्वतःच्या आयुष्यामध्ये बदल करावे लागतात. बदलाला सामोरे जाणे महत्वाचे. बदल होणार आहे. आजची वेळ उद्या राहणार नाही. फक्त ही वेळ आपण कशी सामोरी घालवतो यात आपले कौशल्य नक्कीच आहे.

भीक मागणारे भीक मागून जगतात, चैन करणारे पैसे उडवून जगतात आता यात चुकीचे कोण? हा प्रश्नच नाही. करण ते कसे जगतात याला त्यांनी मिळवलं आणि ते काय जगले या गोष्टी जबाबदार असतात. वाईट वेळ निघून जाते. कोणतीच गोष्ट बिनकामाची कधीच नसते. फक्त या वेळेत स्थिर राहायचं. कारण बंद पडलेलं घड्याळ सुद्धा दोन वेळा अचूक वेळ दाखवत असतं.

म्हणून आपण आज नाहीतर उद्या नाहीतर आता ही काहीतरी विधायक करण्याच्या धडपडेने जगलं पाहिजे. आणि तसं जगण्याला प्रत्येकाला यावं. काही कौशल्य आत्मसात करावी लागतात. ती आपल्या ठायी असतीलच असं नाही.

म्हणून
स्वतः पासून कधी हरायचं नाही…

@के स्वप्निल


असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज 

www.facebook.com/SmartMaharashtraOnline


 

Previous Article

११ जून 

Next Article

‘चला, वाचू या’ अभिवाचन उपक्रमाचा तिसरा वर्धापनदिन १७ जूनला !

You may also like