स्वदेशी वस्तू चा स्वीकार आणि विदेशी वस्तूंवर बहिष्कार

Author: Share:

आपला शेजारी देश चीन हा भूतान मार्गे सिक्कीमच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करत आहे. लेह लडाकमध्ये चीनी सैन्याच्या हालचाली नेहमीच आपल्यासाठी धोक्याच्या ठरल्या आहेत. चीन आपला शत्रू आहे कि नाही हा प्रश्न थोडा वादातीत आहे. देशात लोकशाही असल्यामुळे प्रत्येकाला त्याचे मत मांडण्याचा अधिकार आहे. शत्रूशी लढायचे तर ते बॉर्डरवर. मग यात सामान्य जनतेचा संबंध येत नाही. मग आम्ही देशासाठी काय करावे असा प्रश्न अनेकांना पडतो. पाकिस्तान हा दहशतवादी हल्ले करून देशातील स्थिरता भंग करण्याचा प्रयत्न करत असतो. पण चीनचे धोरण थोडे वेगळे आहे.

भारतात कमी दर्जाच्या व कमी किमतीच्या वस्तू विकून भारतातील लघु उद्योग बंद पाडण्याचा व आपल्या शिवाय पर्याय राहणार नाही अशी स्थिती निर्माण करत आहे. आज भारतीय बाजारपेठेवर चीनने मोठ्या प्रमाणात ताबा मिळवला आहे. तो आपल्याला एका दिवसात किंवा एका वर्षात संपवणे थोडं कठीण आहे.


असे दर्जेदार साहित्य वाचण्यासाठी आमचे पेज LIKE आणि Follow करा: https://www.facebook.com/SmartMaharashtraOnline/


आज हा धोका आपण समजला नाही तर येणाऱ्या भविष्यकाळात परिस्थिती हाताबाहेर गेली असेल. आज आपण १० रुपयाची वस्तू जरी विकत घेतली तर त्यातील एक रुपया तरी आपल्या विरुद्ध वापरणार याची जाणीव आपण ठेवली पाहिजे. शत्रू राष्ट्राच्या वस्तू खरेदी करणे म्हणजे आपले धन आपल्याच राष्ट्राच्या विरुद्ध कृती करण्यासाठी हातभार लावणे होय.

१९६२ साल चे आपल्यावर केलेलं आक्रमण विसरून चालणार नाही. चीनचे असे म्हणणे आहे कि, भारतीय लोक हे मेहनती नाहीत. त्यांना आयत्या गोष्टींची सवय आहे. त्यामुळे ते आमच्याच वस्तू वापणार. आज अनेक संघटना समाजामध्ये चीनी वस्तू घेऊ नये याची जनजागृती करत आहे आणि त्याचा काहीसा परिणाम पण बाजारपेठेवर दिसून आला आहे. समाजातील अनेक लोक अशा संघटनांना प्रश्न विचारत असतात कि, मग हे सरकार का बंदी आणत नाही. मी इथे नमूद करतो कि WTO म्हणजे जागतिक व्यापार संघटना ही जगातील सर्वात शक्तीशाली संघटना आहे व आपला त्याच्याशी करार आहे. त्यामुळे आपण बांधील आहोत. त्यामुळे आपण कुठल्याही देशांशी व्यापार बंद करू शकत नाही, पण सरकारने चीनच्या काही वस्तूंवर आयात कर वाढवला आहे.

No Demand No Supply या मुळे चीनची आयात आपोआप कमी होईल. अनेक तरुण मंडळींना प्रश्न पडतो कि, भारत तर अनेक ठिकाणी चीनचीच टेक्नॉलॉजी वापरतो. पण एकाद्या टेक्नॉलॉजीमुळे आपल्या देशाच्या भविष्यात फायदा होत असेल व देश प्रगतीकडे वाटचाल करीत असेल तर मी म्हणतो काय हरकत आहे टेक्नॉंलॉजी वापरायला. चीन आपल्या देशातील सर्व सणांचा अभ्यास करत असावा असे वाटते, कारण कोणत्या सण व उत्सवाला भारतात कोणत्या गोष्टी लागतात हे त्यांना चांगलेच माहित झाले आहे. आपल्या देशाचे आर्थिक बळ देण्यासाठी जास्तीत जास्त वस्तू आपल्या देशातुन निर्यात झाल्या पाहिजे.

सावरकरांनी १०० वर्षांपूर्वी विदेशी कपड्यामची होळी केली होती हे आपण विसरून चालणार नाही, आज विभक्त कुटुंब पद्धती मुळे विदेशी वस्तू चा खप देखील जास्त होतोय. आधी एका घरात 3 ते 4 कुटुंब सोबत राहत होत, त्या मुळे एक टीव्ही, एक फॅन, एक फ्रीझ, अस सगळे एक होत , आता विभक्त झाल्या मुळे प्रत्येक गोष्टी वेगळ्या लागत आहेत. हे देखील आपल्या भारत देशाचे नुकसानीचे कारण आहे. तर मग आपण सर्वजण मिळून एक ठरऊयात “Be Indian Buy Indian.

@रुपेश बंगाळे

संभाजीनगर,

मोबा.9960344684


असे दर्जेदार साहित्य वाचण्यासाठी आमचे पेज LIKE आणि Follow करा: https://www.facebook.com/SmartMaharashtraOnline/


Previous Article

शहीद शुभम मुस्तापुरे

Next Article

निकाल

You may also like