Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

व्ही. जे. हायस्कूलच्या राष्ट्रीय छात्रसेनेचे नांदगाव रेल्वेस्टेशनवर स्वच्छता अभियान

Author: Share:

नांदगाव (प्रतिनिधि) – ‘स्वच्छ रेल्वे, स्वच्छ भारत’  उपक्रमाअंतर्गत रेल्वे स्टेशन नांदगाव व व्ही. जे. हायस्कूलच्या राष्ट्रीय छात्रसेना पथकाने स्वच्छता पंधरवडा साजरा केला. रेल्वे स्टेशन परिसरात स्वच्छता मोहीम राबविली. नांदगाव रेल्वे स्टेशन प्रबंधक ए.एम. अग्रवाल व एनसीसी अधिकारी जयंत निकम यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविण्यात आले.स्टेशन परिसरात असलेला प्लास्टिक कचरा मोठ्या प्रमाणात साफ करण्यात आला.

या प्रसंगी रेल्वे कामगार सेनेचे अध्यक्ष वामनपोतदार, शिवसेना रेल्वे प्रवासी संघटनेचे तालुका अध्यक्ष तुषार पांडे,रेल्वे रनिंग रूमचे चंद्रकांत मोरे बाबूजी व सफाई कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित सर्व छात्रांना अग्रवाल व पोतदार यांच्या हस्ते बिस्कीट वाटप करण्यात आले. नांदगाव रेल्वे स्टेशनवर झालेले आधुनिक बदल विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले, रेल्वेच्या वाहतुकीचे होणारे नियोजन प्रत्यक्ष कंट्रोलरूम मध्ये नेवून प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. सर्व छात्रांना रेल्वेचे सुरक्षा नियम उपस्थित रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकारी व रेल्वे पोलिसांनी समजून सांगितले व हे नियम नागरिकापर्यंत पोहचविण्याचे आवाहन केले. सुरक्षित रेल्वे प्रवासा संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.

बातमी: प्रा सुरेश नारायणे

Previous Article

कला शिक्षक विजय चव्हाण यांचा स्तुत्य उपक्रम -पर्यावरणपूरक गणेशोत्सवातून जनजागृती

Next Article

नांदगाव येथील सम्राट बहुउद्देशिय गणेश मंडळाने केले मोफत नेत्र तपासणी शिबीरीचे आयोजन

You may also like