Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

पथनाट्य : स्वच्छता अभियान

Author: Share:

 

(दोन बायका घराच्या बसून कपडे धुवत असतात.. टिपिकल मराठी बायका आहेत)

पहिली बाई : (कपडे धुताना, कपडे धुण्याची क्रिया करत) काय गं? जान्हवीला सगळं आठवायला लागलं का?

दुसरी बाई : (कपडे धुताना बोलते) जान्हवी? म्हणजे राऊतांची का?

पहिली बाई : अगं राऊतांची नाय. ती तर रग्या सोबत पळाली ना.. जान्हवी म्हणजे… अगं होणार सून मी ह्या घरची..

दुसरी बाई : बरं बरं म्हणजे आपल्या श्रीची जान्हवी.. मग असं म्हण ना.. तिला आठवतंय थोडं थोडं.. पण आठवेल.. माझा देवावर विश्वास आहे. हिंदीत ते म्हणतात, भगवान के घर देर है पर अंधेर नही..

पहिली बाई : काय पण बोल.. अगदी लक्ष्मी – नारायणाचा जोडा आहे बघ.. मी तर माझ्या मुलाला म्हटलंय, घरात सून आणशील तर जान्हवी सारखी आण. सर्वांना समजून घेणारी.

दुसरी बाई : होय होय.. श्री आणि जान्हवी कसे कुटुंब जोडणारे आहेत.. (तेवढ्यात तो लहान मुलगा येतो)

लहान मुलगा : पण तुमच्या अशा वागण्यामुळे म्हारळचं सौंदर्य तुटेल त्याचं काय?

पहिली बाई : काय रे पोरा? काय खुळा बीळा झालास काय?

दुसरी बाई : हा.. हा.. काय बोलतोयस? कुणाशी बोलतोयस? काय झालं ते सांगशील की नाही?

लहान मुलगा : अहो काकू.. तुम्ही इथे घराच्या बाहेर कपडे धुतायत. त्यामुळे कपड्याचं पाणी गल्लीच्या रस्त्यावर साचतं. खुप दिवस पाणी साचल्यामुळे मच्छर येतात. आता डेंग्यूची साथ पसरली आहे, तुम्हाला माहितीतंच असेल ना? डेंग्यूमुळे अनेक लोकांचा जीव गेला आहे. आपल्या गावात, गल्लीत, रस्त्यावर पाणी साचून देऊ नका. नाहीतर तुमची एवढूशी चूक लोकांच्या जीवावर बेतू शकते.

दुसरी बाई : होय रे बाळा.. अगदी बरोबर बोललास तू.. खरं आहे. आम्ही लक्षात ठेवू

पहिली बाई : हो.. हो.. आम्ही पुन्हा असं नाही होऊ देणार.. बरं मला सांग, कुणाचा रे मुलगा तू?

लहान मुलगा : युवा म्हारळचा..

पहिली बाई आणि दुसरी बाई : काय?..

लहान मुलगा : होय.. मी युवा म्हारळचा.. युवा म्हारळ या संघटनेने स्वच्छता अभियान राबवले आहे. आपलं म्हारळ, स्वच्छ म्हारळ बनवायचं आहे. यासाठी युवा म्हारळची तरुण मुलं सज्ज झाली आहेत.. आता फक्त तुमची साथ हवी आहे.. देणार ना तुम्ही साथ?

पहिली बाई आणि दुसरी बाई : हो.. हो.. नक्की देणार साथ..

(आता दोन्ही बायका आणि मुलगा एकत्र म्हणतात)
अरे स्वच्छ करा की म्हारळ माझा

_________ _____________ _________-

प्रवेश : ३

(एक मुलगी रस्त्यावर नाचतेय… ) (“आता वाजले की बारा” या गीताचे विडंबन)

कचरा कुंडी निकामी आज झालिया भारतात
धडधड काळजात माझ्या होतया.
कदी कवा कुठं कसा रोग पसरला असा
त्याचा न्हाई भरवसा, जीव जातोया.
राखली मी मर्जी, तुमच्या सेवेत मी राबले.
घाण सारी साफ कराया, अंग अंग पछाडले.
कचरा टाकू नका रस्त्यावरी, काळयेळ न्हाई बरी.
पुन्हा येईल रोगराई माणसा…
नका टाकू कचरा रस्त्यावरी, नाहीतर वाजतील बारा..

कशा पाई टाकता, असे काय वागता
असं काय करता, दाजी आहे ना कचर्‍याची पेटी
मलेरियाची साथ आली, डेंग्यूची बि आली
आता डॉक्टरकडे रांगच लागली.
नका टाकू कचरा रस्त्यावरी, नाहीतर वाजतील बारा..
नका टाकू कचरा रस्त्यावरी, नाहीतर वाजतील बारा..

(गाणं सुरु असताना एक माणूस येतो. तिला हाक मारतो)

पहिला माणूस : ये बाई… (ती त्याच्याकडे लक्ष देत नाही, तो जोरात बडबडतो आनी गाणं व नाच थांबवतो) ये बाई, तुला लाज वाटत नाही भर रस्त्यावर नाचायला? कोण गं तू?

बाई : मी कोण? मी कोण आहे हे मीच विसरली..

पहिला माणूस : आयला येडी हाय वाटतं. तरीच रस्त्यावर नाचतेय..

बाई : होय.. मी वेडीच आहे. तुमच्यासारख्या शहाण्यांच्या जगात मी वेडीच ठरणार.. (तेव्हा दुसरा माणूस पुढे येतो)

दुसरा माणूस : काय गोंधळ चाललाय इथे.

पहिला माणूस : हि बाई भर रस्त्यात चक्क नाचतेय.. रस्त्यावरुन लहान मुलं सुद्धा जात असतात. काय संस्कार होतील त्यांच्यावर.

दुसरा माणूस : ओ बाई.. तुम्ही तर चांगल्या घरच्या दिसत आहात. हे शोभत नाही तुम्हाला.

बाई : तुम्ही जे करताय ते तुम्हाला शोभतं?

दुसरा माणूस : काय केलंय मी? उगाच गंडवू नका.. आज ड्यूटीवर नसलो, तरी हवालदार आहे मी.

बाई : हवालदार असून असं वागता?

दुसरा माणूस : पण मी केलं तरी काय?

पहिला माणूस : अहो हवालदार, मला तर वाटतं, हि बाई पुर्ण वेडी आहे. हिला वेड्याच्या इस्पितळात पाठवलं पाहिजे.

दुसरा माणूस : ह्ह्म्म.. मलाही तसंच वाटतंय.. ये बाई.. गप गुमान घरी जा, नाहीतर येड्याच्या इस्पितळात पाठवून देईन.

बाई : इस्पितळ? इस्पितळ कशाला, आता तर मी या जगातूनच नाहिशी होणार आहे.

पहिला माणूस : अगं आत्महत्या वगैरे करणार की काय?

बाई : आत्महत्या नाही.. पण तुम्ही सगळे लोक मिळून माझा जीव घेणार आहात..

दुसरा माणूस : अरे हि बाई भलतीच चॅप्टर निघाली.. थांब तुला आतंच टाकतो.. काय नाव काय तुझं?

बाई : स्वच्छता..

दुसरा माणूस : ए बया.. नाव विचारलं.. काम नाही विचारलं.. हाहाहा.. (दोन्ही माणसं मोठ्याने हसतात)

बाई : मी माझं नावंच सांगितलंय..

पहिला माणूस : स्वच्छता? असं कधी नाव असतं होय?

दुसरा माणूस : कोणाला उल्लू बनवतेयस?

बाई : उल्लू मी नाही.. तुम्ही बनवलंत मला..

दुसरा माणूस : अगं काय बोलायचंय ते स्पष्ट बोल..

बाई : मी स्वच्छता.. मी तुम्हाला अनेक रोगांपासून, दुर्गंधीपासून दूर ठेवते. तुमची, तुमच्या मुला-बाळांची काळजी वाहते. पण तुम्ही याबदल्यात मला काय दिलंत? रस्त्यावर पसरलेला कचरा, साचलेलं पाणी, सगळीकडे नुसती घाण.. हेची फल काय मम तपाला? असं म्हणण्याची पाळी तुम्ही माझ्यावर आणलीत. तुमच्या अशा गलिच्छ वागण्यामुळे माझी वैरीणी अस्वच्छता हिचं राज्य आलंय. आता जवळ जवळ मी मरणालाच टेकली आहे. (दोघेही माणसं एकमेकांकडे पाहतात आनि खजील होऊन मान खाली घालतात) आता का गप्प बसलात? बोला ना आता.. बोला..

पहिला माणूस : आम्ही काय बोलायचं तेच आम्हाला कळेनासं झालंय..

दुसरा माणूस : हो गं बाई.. पण आता तुच काय तो उपाय सांग.. आम्हाला सोडून जाऊ नकोस.. आमची चूक झाली. आम्हाला अस्वच्छता नकोय.. आम्हाला स्वच्छता हवी आहे. काय करावं आम्ही त्यासाठी?

(तेवढ्यात तो लहान मुलगा येतो)

लहान मुलगा : त्यासाठी युवा म्हारळच्या स्वच्छता अभियानात सामिल व्हा.. (सगळे अवाक होऊन मुलाकडे पाहतात)

दूसरा माणूस : कोण रे तू..

लहान मुलगा : मी? मी स्वच्छता मित्र.. होय मी स्वच्छता मित्र आहे.. (तेव्हा स्वच्छता म्हणजे बाई त्या मुलाच्या बाजूला येऊन उभी राहते व सुरक्षित असल्याचा भाव चेहर्‍यावर आणते) आपल्याला जर स्वच्छतेचं राज्य वाचवायचं असेल, तर अस्वच्छतेचा पूर्णपणे नायनाट केला पाहिजे.

पहिला माणूस : म्हणजे काय करायला पाहिजे?

लहान मुलगा : सोपं आहे.. रस्त्यावर कचरा टाकू नये. कचरा हा फक्त कचरा कुंडीतंच टाकावा. घरात, गल्लीत, रस्त्यावर पाणी साचवू नये. साचलं असेल तर ते काढून टाकावं व ती जागा स्वच्छ करावी. रस्त्यावर थुंकू नये, रस्त्यावर शौचक्रिया करु नये.. ऊतू नका मातू नका, रस्त्यावर कचरा टाकून नका..

पहिला माणूस : कचरा फक्त कचरा पेटीतच टाकूया

दुसरा माणूस : आपलं म्हारळ स्वच्छ आणि सुंदर बनवूया..

(आता बाई, दोन्ही माणसं आणि मुलगा एकत्र म्हणतात)

अरे स्वच्छ करा की म्हारळ माझा…

(आता crowd जमा होतो आणि सगळे गाणं बोलतात. सुरुवात तो लहान मुलगा करतो. ३ इडियट्स मधल्या “ऑल इज वेल” या गाण्याचं विडंबन. crowd च्या हातात झाडू असेल तर शोभनिय वाटेल)

जब कचरा हो आऊट ऑफ कंट्रोल. झाडू उठा के बोल.
झाडू उठा के बोल. सिटी बजा के बोल.
स्वच्छता अभियान..

अपना म्हारळ साफ ना होगा तो क्या होगा
अरे गंदगी और बिमारीयो को न्योता होता
कोई ना जाने म्हारळ का फ्युचर क्या होगा.
झाडू उठा सिटी बजा, सिटी बजा के बोल
भैया स्वच्छता अभियान, अरे भैया स्वच्छता अभियान
अरे चाचू स्वच्छता अभियान, अरे भैया स्वच्छता अभियान

कचरा ही कचरा है, डिब्बे का तो पता नही
डिब्बा जो दिखा कही तो, कचरा पडा बिखरा कही.
रस्ते पर कोई बात बात पे थुंकता है.
ऐसी गंदगी क्यू ये फेहलाता है
चलो इन लोगो को समझा दे
झाडू उठा सिटी बजा, सिटी बजा के बोल
भैया स्वच्छता अभियान, अरे भैया स्वच्छता अभियान
अरे चाचू स्वच्छता अभियान, अरे भैया स्वच्छता अभियान

(गाणं संपल्यावर crowd मधले सगळे मुलं जोरात ५ वेळा बोलतात “अरे स्वच्छ करा की म्हारळ माझा)

लेखक : जयेश शत्रुघ्न मेस्त्री
संपर्क : ९९६७७९६२५४

 

Previous Article

शेतीसाठी शासनाच्या योजना

Next Article

तेलाची गोष्ट भाग: १