नांदगाव – औरंगाबाद येथे राष्ट्रवादी भवन येथे प्रा.सुरेश माधवराव नारायणे यांना विधानपरिषदेचे शिक्षक आमदार मा.विक्रम काळे यांच्या हस्ते आण्णाभाऊ साठे उत्कृष्ठ साहित्यीक पुरस्कार दिला हा पुरस्कार औरंगाबाद येथील सदभावना मित्रमंडळ यांच्या तर्फे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मृती निमित्त हा राज्यस्तरीय पुरस्कार दिला या संस्थेने सामााजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व लोककला या क्षेत्रातील राज्यातील मान्यवरांना पुरस्कार देवुन गौरविण्यात आले.
आ. भाऊसाहेब चिकटगावकर, आ. किशोर पाटील, संजय वाकचौरे, अध्यक्ष दशरथ मानवतकर या मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी कवी काशिनाथ गवळी, प्रा. दिनेश उकिर्डे, प्रा. विक्रम घुगे, चंद्रकांत ढासे, वडील माधवराव नारायणे, आई, सौ. अलका नारायणे, निनाद नारायणे, हर्षद नारायणे, संतोष बोराडे, राजेंद्र सोनटक्के, केशव इंगळे व महाराष्ट्रराज्यातुन अनेक पुरस्कार्थी यावेळी उपस्थित होते मविप्र संस्थेचे सरचिटणीस निलीमाताई पवार, अध्यक्ष तुषार शेवाळे, सभापती माणिकराव बोरस्ते, नांदगाव तालुका संचालक दिलीप पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. आय. पटेल भास्कर कदम नांदगाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सुरेश शेळके व परिसरातील अनेक मान्यवरांनी प्रा.नारायणे यांचे अभिनंदन केले.