जिजामाता विद्यालयातील विद्यार्थिनींनी गिरवले सुरक्षिततेचे धडे

Author: Share:

नाशिक :- उत्तम गिते – शिक्षण व्यवस्थेचा महत्त्वाचा केंद्रबिंदू म्हणजे विद्यार्थिनींची सुरक्षितता म्हणूनच महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेत शालेय विद्यार्थी परिवहन व सुरक्षा महत्त्वाची असल्याने विशाखा आणि परिवहन समिती अंतर्गत जिजामाता कन्या विद्यालयात विद्यार्थिनींनीची सुरक्षा याविषयावर मार्गदर्शन करताना पोलिस उपनिरीक्षिक दिपक तनपुरे यांनी सोशल मिडीयाचा वाढता गैरवापर, महिला सुरक्षा व कायदा व्यवस्था आणि शाळेत येताना जाताना घडणाऱ्या घटनांविषयी विद्यार्थिनींना जागरुक केले.

तसेच लासलगाव स्थानक प्रमुख भगवान मुंडे यांनी समुपदेशन करताना वाहतूकीचे गैरप्रकार, विद्यार्थिनींची सुरक्षित ने-आण करणे,वायुप्रदुषण नियंत्रण, वाहन चालवण्याचे परवाने व नियमांची माहिती दिली. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब पाटील, उपाध्यक्ष निवृत्ती गायकर,सचिव संजय पाटील, कार्यकारी अधिकारी वैष्णवी पाटील, सीताराम जगताप, कैलास महाजन, पर्यवेक्षक बाबासाहेब गोसावी तसेच शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थितीत होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आरती गायकर तर आभार बाळासाहेब झाल्टे यांनी केले.

Previous Article

जिजामाता प्राथमिक शाळेत दप्तरमुक्त शनिवार उपक्रम संपन्न

Next Article

जिल्हा परिषद शाळा अजूरफाटा येथे साजरा होणार ऑगस्ट क्रांति पंधरवडा

You may also like