ध्वनिप्रदूषणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाला सुप्रीम कोर्टाने आज स्थगिती

Author: Share:

ध्वनिप्रदूषणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाला सुप्रीम कोर्टाने आज स्थगिती दिल्याने मंडळांनी सुट्लेचा निश्वास सोडला आहे. उद्या गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत लाऊडस्पीकर लावण्याचा मार्ग खुला झाला आहे. 

ध्वनिप्रदूषणामुळे नागरिकांच्या जगण्याच्या हक्काचा भंग होत असल्याचे स्पष्ट करीत शांतता क्षेत्राच्या १०० मीटर परिसरात अशांतता निर्माण करणारे कृत्य बेकायदेशीर असल्याचे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते. शांतता क्षेत्रे नाहीसे करणाऱ्या केंद्र शासनाच्या १० ऑगस्टच्या अधिसूचनेच्या अंमलबजावणीला मुंबई उच्च न्यायालयाने गेल्या शुक्रवारी स्थगिती दिली होती.

या आदेशाला आज सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली. त्यामुळे मुंबईतील शांतता क्षेत्रांमध्ये उद्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान लाउडस्पीकर वाजवता येणार आहेत.
राज्य सरकारच्यावतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी हायकोर्टाच्या स्थगितीवर आक्षेप नोंदवला होता.
Previous Article

५ सप्टेंबर

Next Article

मत्स्यशेती कशी करावी?

You may also like